मूळव्याधवर घरगुती उपाय, हे एकदा नक्की करून पहा !

मूळव्याधवर घरगुती उपचार !


 Mulvyadh :- मूळव्याध कोणालाही होऊ शकतो. मूळव्याध झाला तर घाबरण्याची गरज नाही. यावर वैद्यकीय उपचार घेणे खूप आवश्यक आहे. तसेच यावर घरगुती उपाय आपण घेऊ शकतो. त्यामुळे थोड्या प्रमाणात आराम मिळतो व काही वेळेस तो बरा सुद्धा होतो.


                 

मूळव्याधवर घरगुती उपाय, हे एकदा नक्की करून पहा !
मूळव्याधवर घरगुती उपाय, हे एकदा नक्की करून पहा !



 आयुर्वेदाने सांगितलेल्या आठ महाव्याधींपैकी एक आहे मूळव्याध, मूळव्याध गुदभागी होत असली, तरी तिचे मूळ अपचनात असते, अगोदर खाल्लेले अन्न पचण्यापूर्वीच पुन्हा अन्न खाणे, परस्परविरोधी गुणाचे पदार्थ एकत्र मिसळून खाणे, मल-मूत्र वाचू वगैरे नैसर्गिक आवेगांना बळेच धरून ठेवणे, वगैरे कारणांनी मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.

हे पण बघा -   ऍसिडिटीपासून मिळवा कायमची मुक्तता...!! 

 मनुष्याने अन्न वरून घेतले तरी त्याचा मलभाग खाली जातो. मलभाग गुदमार्गातून बाहेर जातो. अन्नात दोष वा विकार असेल तर गुदमार्गाला, गुदाला व्याधी होणे शक्य असते. तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर शौचाला आग झाल्यासारखे भासते. अर्थात तोंडाने जेवढे तिखट खाता येते, तेवढे गुदमार्गाला झेपेलच असे नाही.


 अपचन, चुकीचे खाणे-पिणे, वेळी-अवेळी खाणे वा झोपणे तसेच रोज रोज जागरणे झाली तर पित्त वाढते, एकंदरच चुकीची जीवनशैली अंगीकारली की सर्वात प्रथम आघात होतो तो पोटावर, पचनावर तसेच पोट नीट साफ न होणे यातून अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यातून मूळव्याध, फिशर (गुदभागी चिरा पडणे) आणि भगंदर हे सुद्धा असेच मागे लागणारे रोग होत.

  'मूळव्याधवर घरगुती उपाय, हे एकदा नक्की करून पहा !'

मूळव्याधवर घरगुती उपाय, हे एकदा नक्की करून पहा !


                                                                     आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!

 * मूळव्याधीवर करता येणारे घरगुती उपचार  :- 

1) रात्री झोपतांना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यावे.

2) बेलफळाचा गर व पाठापूर्ण मिसळून घ्यावे.

 3) रक्त पडत असल्यास नागकेशर व घरचे ताजे लोणी हे मिश्रण दिवसातून 2/3 वेळा घ्यावे.

४) मोडाला खाज येत असल्यास सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.

मूळव्याधवर घरगुती उपाय, हे एकदा नक्की करून पहा ! मूळव्याधवर घरगुती उपाय, हे एकदा नक्की करून पहा ! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on March 30, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.