Stomach Gas : पोटामध्ये गॅस होतोय ? पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय...



'ढेकर आला म्हणजे पोट छान भरले' असा समज प्रचलित असतो. शुद्ध ढेकर येणे हे अन्न व्यवस्थित पचल्याचे एक लक्षण आहे. एकंदरच ढेकर येणे किंवा गुदावाटे वायू सरणे ही गोष्ट सर्वांच्याच परिचयाची असते. मात्र, या दोहोंपैकी एकाही क्रियेचा अतिरेक त्या व्यक्तीला आणि आसपासच्या लोकांना मोठा तापदायक ठरू शकतो. विशेषतः ढेकर देताना किंवा वायू सरताना आवाज होत असला किंवा दुर्गंध येत असला, तर खूपच अवघड होते. स्वतः व्यक्तीलाही पोटात किंवा आतड्यात अडकून राहिलेल्या वायूमुळे फार अस्वस्थ व्हायला होते.   


Stomach Gas : पोटामध्ये गॅस होतोय ? पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय
Stomach Gas : पोटामध्ये गॅस होतोय ? पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय...


वास्तविक पोटात काही प्रमाणात गॅसेस तयार होणे स्वाभाविक असते. अन्नपचन होत असताना ज्याप्रमाणे मळ, मूत्र तयार होतात, तसाच काही प्रमाणात वायूसुद्धा तयार होत असतो, जो मळाच्या बरोबरीने शरीराबाहेर निघून जाणे अपेक्षित असते. शिवाय, अन्न गिळताना हवा आत गेली, तर त्यामुळेसुद्धा पोटात गॅसेस होऊ शकतात, ही हवा एक तर ढेकराच्या रूपाने बाहेर पडते किंवा अन्नाबरोबर आतड्यांपर्यंत पोचली तर गुदावाटे निघून जाते. जेवताना बोलणे, हसणे यामुळे, तसेच फार घाईघाईने किंवा उभ्या उभ्या व बोलता बोलता जेवण्याने अन्नाबरोबर हवा आत जाण्याचे प्रमाण वाढते, पर्यायाने गॅसेसची प्रवृत्ती वाढते. त्यावर काही पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय दिलेले आहे.



⚫ गॅसेस का होतात?

अग्नी मंदावणे व त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित न होणे हे गॅसेस होण्यामागचे मुख्य कारण असते. याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे होत. -


पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय


■ अवेळी जेवणे, विशेषतः दुपारचे जेवण टाळून रात्री भरपेट जेवणे.


■ अति प्रमाणात खाणे, भूक नसतानाही एखादी वस्तू केवळ आवडीपायी अति प्रमाणात खाणे.


■ स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल नसणारे अन्न सेवन करणे.


■ पचण्यास जड, शीत, रुक्ष गुणाचे अन्न सेवन करणे.


■ शिळे, नीट न शिजलेले अन्न सेवन करणे.


■ मोठ्या व्याधीमुळे शरीर अशक्त होणे.


■ देश, काळ, ऋतू यांच्यामध्ये बिघाड झालेला असणे.


■ मळ, मूत्रादी नैसर्गिक वेग अडवून ठेवणे.


■ भय, चिंता, शोक वगैरे मनोविकारांचा अतिरेक होणे.


हे पण बघा : ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!


⚫'गॅसेस'वाला आहार


अग्नी मंद होऊन पचन बिघडण्यामागे अन्न महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रकृतीचा विचार न करता सेवन केलेले अन्न अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकते; पण त्यातल्या त्यात गॅसेस करू शकणाऱ्या अन्नात पुढील गोष्टींचा समावेश होतो -   

■ कोबी, फ्लॉवर, कांदा, मुळा, ढोबळी मिरची वगैरे भाज्या.

■ आकाराने मोठी असणारी कडधान्ये, उदा. चवळी, वाटाणे, , पावटा, डबल बी वगैरे.

■ अंडी व इतर मांसाहारी पदार्थ.

■ तळलेले पदार्थ.

■ चीज, पनीर वगैरे अति स्निग्ध पदार्थ.

■ शीतपेये, फळांचे डबाबंद रस.

■ मद्य.

■ दुधाची भुकटी, साखर.

■ मैद्यापासून बनविलेले पदार्थ.

■ गोठवून ठेवलेले पदार्थ.

■ कृत्रिम प्रिझर्वेटिव्हज् टाकून टिकविलेले पदार्थ.

■ ब्रेड, खारी, बिस्किटे वगैरे बेकरीमध्ये मिळणारे पदार्थ.

■ व्हिटॅमिन्स वगैरेंची पूरक औषधे.

■ कच्च्या भाज्या, सॅलड अधिक प्रमाणात खाणे.

■ कच्ची कंदमुळे सेवन करणे.



⚫ लंघन आणि स्वेदन


या शिवाय व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, दिवसा झोपणे, नियमित जागरणे करणे, सततच्या प्रवासामुळे खाण्या-पिण्यात सारखा बदल होणे, झोपेच्या वेळा बदलत राहणे वगैरेंमुळेसुद्धा पोटात गॅसेस होण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. आयुर्वेदात यालाच आध्मान किंवा आनाह असे म्हटले आहे.   


पोटातील गॅस कमी घरगुती उपाय


पोटात वायूचा अतिशय संचय होणे म्हणजे 'आध्मान', तर वायूच्या अवरोधामुळे पोट फुगणे, पोटात दुखणे, पोटातून गुडगुड आवाज येणे म्हणजे 'आनाह' होय. या दोन्ही अवस्थांवर विशेष उपचार पुढीलप्रमाणे सांगितले आहेत :


🔸 लंघन - भूक लागलेली नसताना जबरदस्तीने खाणे टाळणे, भूक लागली तरी हलके अन्नच घेणे व रात्री फक्त द्रवाहार (धान्य वा भाज्यांपासून बनविलेले सूप) घेणे या सर्वांचा अंतर्भाव लंघनात होतो. प्रकृती ध्यानात घेऊन योग्य प्रकारे योजलेल्या लंघनामुळे अग्नी प्रदीप्त होतो, पर्यायाने गॅसेसची प्रवृत्ती नाहीशी होते.

🔸 स्वेदन - पोटावर हलक्या प्रमाणात शेक करण्याने वात सरून जाण्यास मदत मिळते.


🔸 बस्ती - दीपन म्हणजे अग्नी प्रदीप्त करणाऱ्या व पाचन म्हणजे पचन सुधारणाऱ्या औषधी द्रव्यांच्या मदतीने बस्ती घेणे हेसुद्धा उपयोगी असते.


🔸 दीपनसिद्ध अन्न - लंघनादी उपचार केल्यानंतरसुद्धा अग्निदीपन, पचनास मदत करणाऱ्या द्रव्यांची मदत घेऊन अन्नयोजना करायला हवी. यात जिरे, ओवा, हळद, लसूण, धणे, सैंधव मीठ, आले, लिंबू, पुदिना वगैरेंचा समावेश होतो.


आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!


⚫ सहज उपचार       

गॅसेस झाले असता किंवा गॅसेसची प्रवृत्ती नाहीशी करण्याकरिता याच तत्त्वांवर आधारित सोपे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील. 


पोटातील गॅसेस वर आहार



■ प्यायचे पाणी (फिल्टर केलेले असले तरी) १५ मिनिटांसाठी उकळून घेणे. पोटातील वायू सरून जाण्यासाठी उकळलेले गरम पाणी पिणे श्रेयस्कर होय.



■ जेवणाच्या अगोदर आल्याचा छोटा तुकडा सैंधव मिठासह चावून खाणे किंवा चमचाभर लिंबाचा रस, पाच-सहा थेंब आल्याचा रस, दोन चिमूट जिरे व चवीपुरते सैंधव असे मिश्रण घेणे.



■ रोज सकाळी उठल्यानंतर सुंठ- गूळ- तूप यांपासून तयार केलेली छोट्या सुपारीच्या आकाराची गोळी घेणे.



■ लिंबापासून बनविलेली 'लिंबोटी' हीसुद्धा पचन सुधारून वायू सरून जाण्यास मदत करते. लिंबाला एका बाजूने मध्यभागी चिरावे, त्यात हळद, सैंधव, ओवा, हिंग, जिरेपूड हे पदार्थ भरावे, लिंबू दोऱ्याने बांधावे व लोखंडाच्या पळीत किंवा कढईत ठेवून दोन्ही बाजूंनी गरम करावे. लिंबाचा रस बाहेर येऊ लागला की पळीतून बाहेर काढून पिळून घ्यावे. हा रस थोडा थोडा घेण्याने लगेच बरे वाटते.



■ पोटात वायू भरून राहिल्यामुळे फार अस्वस्थपणा जाणवत असल्यास पोटावर पातळ सुती कापड ठेवून त्यावर हिंग, वेखंड, सैंधव, मोहरी यांचा गरम लेप लावता येतो. याने वायू सरून जाण्यास मदत मिळते.



■ आमसुलाचे सार, जिरे- हिंग- आल्याचा रस टाकून तयार केलेले मुगाचे कढण अशा गोष्टी घेणे, भूक लागली तरी मऊ भात-तूप, गोड ताकाची कढी-खिचडी असा साधा सोपा आहार घेणे श्रेयस्कर.



■ दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजे गोड ताक (जिरेपूड, सैंधव टाकून) घेणेही चांगले.



■ आल्याचा छोटा तुकडा सैंधव मिठात बुडवून जेवणापूर्वी तोंडात धरला, जेवणाच्या सुरवातीला मऊ-भात-लिंबू-तूप घेतले, तर गॅसेसला प्रतिबंध होऊ शकतो.



■ जेवणाच्या शेवटी जिरे-मीठ घालून ताजे ताक घेण्याने गॅसेसच्या त्रासापासून चार हात दूर राहता येते.



■ घशात व छातीत जळजळ होत असेल तर ५-६ काळ्या मनुका तुपावर हलक्या परतून घ्याव्यात. त्यावर चवीनुसार सैंधव, बारीक केलेली थोडी खडीसाखर भुरभुरवून नीट चघळून खाण्याने बरे वाटते.


■ रात्री अपरात्री ॲसिडिटी झाली, पोटात गॅस झाला तर कारण नसताना ताण येतो, काय करावे हे सुचत नाही, अस्वस्थपणा इतका असतो की झोप येणे दूरची गोष्ट असते. अशा वेळी आले-लिंबू-मधाचे चाटण थोडे थोडे चाटण्याचा आणि बरोबरीने पोटाला तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करण्याचा लगेच गुण येतो.  


पोटातील गॅसेस लगेच संपवा


अशा प्रकारे पोटात वायू होण्याचा त्रास असणाऱ्यांनी सर्वप्रथम कारण शोधून काढले व योग्य उपायांची योजना केली, तर पचन सुधारून एकंदर सर्व आरोग्य नीट राहण्यास मदत मिळेल.

🔸 पथ्य : 

भाजून घेतलेला जुना तांदूळ, ज्वारी, नाचणी, वरई, मूग, तूर, राजगिरा, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, साळीच्या लाह्या, आवळा, डाळिंब, पपई, द्राक्षे, धणे, जिरे, बडीशेप, ओवा, वेलची, आले, लिंबू, कढीपत्ता, घरी बनविलेले साजूक तूप, कोकम, उकळून सामान्य तापमानाला थंड केलेले पाणी.


🔸 अपथ्य : 

नवी धान्ये, कोबी-फ्लॉवर, वाटाणा, चवळी वगैरे कडधान्ये, चमचमीत तेलकट पदार्थ, पनीर, चीज, मैद्याचे पदार्थ, बेकरीतील पदार्थ, विरुद्ध अन्न, मद्यपान, चहा कॉफीचे अतिसेवन, तंबाखू.




जास्त विचारले जाणारे प्रश्न....

१) पोटामध्ये गॅस झाल्यावर काय करावे ?
२) पोटात गॅस होण्याचे कारण काय ?
३) पोटात गॅस कसा होतो ?
४) पोटात गॅस झाल्यावर कोणता आहार घ्यावा ?

या सर्वांची उत्तरे वर देण्यात आलेली आहे. तरी लेख लक्ष देऊन वाचा ,त्याचबरोबर तुम्हाला अनेक प्रश्नांनची उत्तरे वर मिळतील. 


हे पण नक्की वाचा..............







Stomach Gas : पोटामध्ये गॅस होतोय ? पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय... Stomach Gas : पोटामध्ये गॅस होतोय ? पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय... Reviewed by आयुर्वेदिक उपाय on May 11, 2023 Rating: 5

1 comment:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.