सर्दी व खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय

 सर्दी व खोकल्यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय !

 सध्या हवामानातील बदल व थंडी यामुळे अचानक सर्दी, घसादुखी व काही वेळा ताप यांचा त्रास होत आहे. पित्त वाढल्याने होणारी सर्दी ही पित्ताची सर्दी असू शकते. 


सर्दी व खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय


नाकात धूळ व धुर जाणं आणि जागरण होणं हि सर्दी होण्याची मुख्य कारण आहे.यावर खाली काही घरगुती आयुर्वेदिक उपाय देण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्दी व खोकला घरगुती उपायांनी बरा करू शकतो.

सर्दी व खोकल्यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय !


बऱ्याचवेळा सर्दी नसते मात्र नाक चोंदलेले राहते, तसेच सारख्या शिंका येऊन नाकातून पाणी येत असते , सारखे सारखे खाकरावे लागणे, नाक पुसणे यामुळे आपण हैराण आणि बेजार तर होतो पण लगेच मोठ्या दवाखान्यात जायला तयार ही नसतो.


सर्दी व खोकल्यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय !


अशा या सर्दीला आपण घरच्या घरी बरी करू शकतो  व 'आपण घरचा वैद्य बनू शकतो

* सर्दी झालीच तर........ 


१) सर्दी व खोकल्यावर हळद फायदेशीर असते. नाक वाहत असेल तर हळकुंड जाळून त्याचा धूर घ्यावा, याने नाकातून पाणी येईल आणि लगेचच आराम मिळेल.

सर्दी व खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय


२) नाक बंद झाले असेल तर कलमी, काळेमिरे, वेलची आणि जिरे समप्रमाणात घेऊन एका सुती कापडात बांधून त्याचा वास घ्यावा, लगेचच शिंका येतील व आराम मिळेल.


३) काही वेळा नाकात धूळ-धूर जाणे, जागरण होणे यामुळेही सर्दी होते. ही सर्दी जाण्यासाठी अडुळशाचा काढा घ्यावा.

४) गवती चहाचा काढा साखर घालून घेता येतो.



) लवंग व सुंठीचा काढा मध घालून घेतल्याने सर्दी कमी होते.




६) काही वेळा ओव्याची धुरी घेतल्याने सर्दी कमी होऊ शकते. 




७) ओवा परतून त्याची पुरचुंडी रुमालात बांधून ती हुंगली, तर सर्दी सटासट बाहेर पडू शकते.


८) सैंधव, मोहरी, पादेलोण यांच मिश्रण मध किंवा पाण्यातून घेता येईल.



९) आठवड्यातून दोन वेळा पाण्यात ओवा, गवती चहा, तुळशीची पाने, आले टाकून वाफारा घेण्याचा उपयोग होईल.


१०) काही दिवस साध्या चहाऐवजी गरम पाण्यात किसलेले आले, पुदिना, दालचिनी, मिरे, साखर टाकून उकळून, गाळून घेतलेला औषधी चहा पिण्याचा चांगला फायदा होईल.



११) घसादुखीसाठी एक कप दुधात चिमुटभर हळद घालून, ते उकळुन गरमचं प्यावे.



१२) एका लिंबाच्या रसात थोडी साखर व मीठ उकळलेल्या पाण्यात घालून ते गरमच प्यावे. लिंबाचा रस व मथ सारख्या प्रमाणात मिसळून, एक चमचा थोड्या, थोड्या वेळाने घेतल्यास घशाची खवखव थांबते.




सर्दी व खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय सर्दी व खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 01, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.