'असे दिसा सुंदर' घरगुती उपाय

सुंदर दिसण्यासाठी व चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून बघा. 

'असे दिसा सुंदर' घरगुती उपाय


निसर्गाने मनुष्याला सौंदर्याचे वरदान दिले आहेच पण त्यासाठी आरोग्याचा पाया मजबूत असायला हवा. आरोग्य आणि सौंदर्य या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. कायमचे आणि मुळापासून सौंदर्य हवे असेल तर आरोग्याचा पाया बळकट असावाच लागतो आरोग्यासाठी जागरुकता ठेवली तर त्यामागोमाग सौंदर्याचा आपसूकप लाभ होतो.


'असे दिसा सुंदर' घरगुती उपाय


स्त्री आरोग्य, त्वचेची कांती, नितळपणा हा तिने घेतलेल्या शुद्ध व सकस आहारावर अवलंबून असतो. त्वचा स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी त्वचा खरवडणे, त्वचेवर केमिकल्स असलेली सौदर्यप्रसाधने वापरणे, या सगळ्यामुळे सौंदर्य मिळणार नाही. सौदर्यासाठी त्वचेची सतेजता, नितळता महत्वाची असते.

त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचा कोरडी पडणे हे सौंदर्याला घातक एक शकते. अशावेळी अंगाला आयुर्वेदिक तेल लावणे उत्तम असते व स्नानाच्यावेळी आयुर्वेदिक उटणे वापरावे. नियमितपणे उटणे वापरल्यास त्वचा मऊ होते, अंगावर खाज येत असल्यास थांबते, अंगाला सुगंध येतो, सुरकुत्यांना प्रतिबंध होतो, त्वचा घट्ट राहण्यास मदत मिळते.

'असे दिसा सुंदर' घरगुती उपाय


चेहत्याची त्वचा अधिक नाजूक असते. ऊन, वारा यांच्याशी चेहऱ्याचा त्वचेचा अधिक संबंध येत असतो, यामुळे त्वचा काळवंडू नये, कोरडी व निस्तेज होऊ नये, यासाठी आपण घरच्या घरी आयुर्वेदाच्या सहाय्याने तिचे "रक्षण करू शकतो.

 मुरुमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतात . चारचौघात जाणे ही त्रासदायक वाटले. मुरुम कोणत्याही वयात येऊ शकतात.तेलकट त्वचेच्या लोकांना मुरुमांचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते. मुरुम कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ते वाढतातही. अशावेळी चेहऱ्याला साबण किंवा फेसवॉश न वापरता उटण्याचा फायदा होतांना दिसतो. नियमितपणे उटणे वापरल्यास त्वचा मऊ होते. 




तेलकट त्वचा असणाऱ्यांनी उटणे ताकात किंवा दह्यात मिसळून लावावे. म्हणूनचं खाली दिलेल्या काही गोष्टी कडे लक्ष दिले तर मुरमाचा त्रास कमी होऊन सौंदर्यात भर पडेल.

करावयाचे उपाय..........

 १) गुलाबपाणी आणि कापूर यांचे मिश्रण बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. मुरूम जेव्हा होतील, त्यावेळी कापसाने  हे मिश्रण चेहयावर लावा असे केल्याने नक्कीच मुरूम कमी होतील.



 २) संपूर्ण चेहयावर मुरूम पसरली असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्र वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. त्याने चेहरा स्वच्छ होईल. कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात. 



 ३) उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते, प्रदुषणामुळे चेहरा काळा पडलो. व नियमितपणे साफ न झाल्यामुळे मुरूम येतात. चेहत्याला स्वच्छ ठेवण्यासाठी बेसनात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा साफ व स्वच्छ होतो. हे फेसपॅक चे काम करते. 



४) मुलतानी माती पाण्यामध्ये टाकून तिची पेस्ट बनवा. नंतर ती चेहऱ्याला लावा. मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो. मुरुमांवर हाही एक जालीम उपाय आहे.


५) गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहयावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो. मुरुम व्हायला यामुळे अटकाव होतो.


६) तुळस व लिंबाच्या पानाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मुरूम होत नाहीत.


७) पाण्यात चंदनाची पावडर टाकून चेहयाला लावल्यास थंडावा मिळतो व चेहयावर तेज येते.


८) गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून चेहल्यावर लावल्याने मुरूम कमी होतात.


९) त्वचेचा पोत सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करा. यासाठी पालेभाज्या,फळे खा. भरपूर पाणी प्या.


१०) त्वचेसाठी पारंपारिक उटणे लावा.

११) त्वचेचे सौंदर्य टिकविण्यासाठी तिळाचे तेल लावून सर्वांगाला मालिश करा. 


१२) केसांना आवळा तेलाचा मसाज करा. केसांना वाफ देऊन कोंडा नियंत्रित करा.


१३) नियमित मसाज केला असता,लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

१४) डाळिंब आणि बीटचा रस रोज रात्री ओठांना लावा. घरगुती तुपाने ओठांना मसाज करा.



'असे दिसा सुंदर' घरगुती उपाय 'असे दिसा सुंदर' घरगुती उपाय Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 03, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.