उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !

उन्हाळा तीव्र व्हायला लागला की त्याच्या झळा व ज्वाळा बंद घरातही येऊ लागतात. कारण दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरुवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्ती परत घेण्यास सुरुवात करतो . उन्हाळ्यात जलशक्ती परत ओढून घेण्याचे काम सुरू झालेले असते.

उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !

उन्हाळ्याच्या झळा वाढत जातात, तशी पचनशक्ती कमी कमी होत जाते. वातावरणातील व शरीरातील रुक्षता वाढते. थकवा, निरुत्साह जाणवायला सुरुवात होते . अर्थात , शरीरशक्ती सुद्धा कमी झालेली असते. अश्यावेळी उन्हाळयाची तक्रार न करता, आपल्या वागण्याने उन्हाळा कसा सुसहय होईल हे पाहणे इष्ट ठरते.

                                                                                          आयुर्वेदिक  उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!

वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे आपल्याला बाधा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच उन्हाळ्यामुळे शरीरात काय बदल होतात यावर आपले लक्ष असले पाहिजे.

या उन्हाळ्यात आपली काळजी नक्की घ्या


उन्हाळ्यात घराबाहेर पडतांना सुर्याच्या उष्णतेपासून बचावासाठी छत्रीचा वापर करावा. उन्हाळ्यात घाम जास्त प्रमाणात येतो.तरी घामोळे येण्याचाही त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढणे सहाजिकच असले तरी कपडे ओले होतील इतका घाम येणे, घामाला एक प्रकारचा तीक्ष्ण गंध असणे फारच त्रासदायक असते. हे टाळण्यासाठी स्नानाच्यावेळी कुळथाचे पीठ, वाळा, अनंतमूळ, नागरमोथा, यापासून तयार केलेले उटणे लावण्याने उपयोग होईल.

उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा

स्नानानंतर काखेमध्ये किंवा अति प्रमाणात घाम येणाऱ्या इतर ठिकाणी तुरटीचा खडा फिरवण्याचा उपयोग होईल.उन्हाळ्यात त्वचेवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून उन्हात जातांना 'सनस्क्रीन क्रीम' वापरावे. स्नानाच्यावेळी साबणाऐवजी अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरल्याने त्वचेचे संरक्षण होते .

आयुर्वेदिक उपाय या Whatsapp ग्रुपला Join होण्यासाठी यावर क्लिक करा ...


उन्हाळ्यात कपडे सुती किंवा रेशमी, शक्यतो हलक्या रंगाचे घालावे. फार घट्ट कपडे घालू नये. 

(1) घामोळे आल्यास त्यावर चंदनाचा गंध लावल्याने घामोळ्या येत नाही.


(2)वाळा, धणे, नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करून घामोळ्यावर लावल्याने घामोळ्या कमी होतात.

'उन्हाळ्या लागणे' हा उन्हाळ्यात होत असणारा त्रास. उन्हाळ्या लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे. हा त्रास उन्हाळ्यात बऱ्याच जणांना होतो. विशेषत: पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्याने  उन्हाळा लागण्याची प्रवृत्ती तयार होते. यावर हे उपाय करता येतात -

(१) सकाळ-संध्याकाळ साळीच्या लाह्यांचे पाणी पिणे.     


                                 

(२) धणे-जिऱ्याचे पाणी पिणे.


(३)अधून मधून शहाळ्याचे पाणी पिणे. 


(४) धणे, जिरे, अनंतमूळ प्रत्येकी पाव पाव चमचा रात्रभर कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन पिणे. 

 


उन्हाळ्यात हाता-पायांची आग होणे ही सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळणारी तक्रार असते.यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे पादाभ्यंग करणे. पादाभ्यंग म्हणजे तळपायांना तेल चोळणे.

(१) आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याने उष्णता कमी होते.


(२) दुर्वाच्या हिरवळीवर सकाळ-संध्याकाळ अनवाणी पायांनी चालण्याने तळपायाची उष्णता कमी होण्यास मदत मिळते.


(३) मेंदीची ताजी पाने वाटून तयार केलेला लेप तळपाय व तळहातावर लावल्याने आग कमी होते.


(४) उन्हाळ्यात संपूर्ण अंगाचाही दाह होऊ शकतो. अशावेळी कलिंगडाच्या सालीच्या आत असणारा पांढरा गर अंगावर लावण्याने उपयोग होतो.



उन्हाळ्यात डोळ्यांची होणारी जळजळ याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

डोळे जळजळत असतील तर झोपही शांत लागणार नाही.  डोळ्यांची आग कमी होण्यासाठी घ्यावयाची काळजी.   

(१) कोरफडीचा गर बंद डोळ्यावर ठेवण्यानेही डोळ्यांची आग लालसरपणा वगैरे त्रास कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांची आग कमी होण्यासाठी घ्यावयाची काळजी

(२) झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर शुद्ध गुलाबजलाच्या घड्या ठेवाव्या. झोप शांत लागते .

झोप शांत

(३) गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवल्याने डोळ्यांना गारवा मिळतो.

अशा या उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष असू द्यावे. म्हणूनच उन्हाळ्यात सरबत पिण्याची पद्धत असते. असह्य वाटणारा उन्हाळा सरबतामुळे सुसह्य होतो.


उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होणार नाही

उन्हाळ्यात निसर्गतःच रसाळ फळे येतात. आहारात या फळांचा समावेश करण्यानेही उन्हाळा सुसहय होण्यास मदत मिळते . या उन्हाळ्यात आपली काळजी नक्की घ्या                                                            


'असे दिसा सुंदर' घरगुती उपाय - हा लेख नक्की वाचा. 

इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या ......... !! 

उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !  उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा ! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 04, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.