मूतखडा : कारणे व उपचार


मुतखडा झालाय ? करणे व उपाय नक्की बघा ! 

मूतखडयांमुळे प्रत्येक वेळी दुखेलच असे नाही, तसेच पोटातील प्रत्येक दुखणे मुतखड्यामुळेच असेल असे नाही . पोटात दुखण्याची, कळ येण्याची जागा व इतर माहितीवरून मूतखड्याची शंका येते.


मात्र निश्चित निदानासाठी लघवीची तपासणी, सोनोग्राफी किंवा अधिक तपासण्या कराव्या लागतात. यात खड्याची तपासणी, खड्याची जागा, खडयाचा आकार तसेच खडा नेमका कोणत्या घटकाचा आहे हे समजते. याबरोबर आणखी किती खडे आहे तेही कळते.

                                                                                           आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!

मूतखडा हा सर्वसाधारपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते.


मूतखडा : कारणे व उपचार
मूतखडा : कारणे व उपचार 

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मूतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मूतखडा तयार होतो.

मूतखडयाला वैद्यकीय भाषेत 'नेफ्रोलिथायसिस' (Nephrolithiasis) असे म्हणतात. सामान्यपणे व्यवहारात 'किडनी स्टोन '(kidney stones) म्हटले जाते. आयुर्वेदात मुतखड्याला 'मुत्राश्मरी' असे म्हणतात. (अश्मरी म्हणजे खडा) .



मूत्रसंस्था ही आपल्या शरीरातील विसर्जन संस्था आहे . लघवी मध्ये पाणी, अनेक प्रकारचे क्षार, आणि चयापचय प्रक्रियेतील (मेटाबोलिक ) घटक असतात .

शरीरात अधिकचे झालेले क्षार , चयापचय प्रक्रियेतील (मेटाबोलिक) घटक व पाणी मूत्रपिंडामध्ये वेगळे केले जातात. हे अधिकचे क्षार लघवीत विरघळून बाहेर पडत असतात. पण जेव्हा या क्षारांचे लघवीतील प्रमाण वाढते तेव्हा ते विरघळण्याच्या स्थितीत न राहता त्याचे स्फटिक तयार होतात. लघवीतील क्षारांची व अन्य घटकांची या स्फटिकांवर रोज पुटे चढून खडा मोठा होत जातो.   

                                                                                                 आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!! 

मूतखडा होण्याची कारणे :-

(१) श्रम किंवा व्यायाम करतांना अधूनमधून थोडे थोडे पाणी पीत शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखले पाहिजे. पण तसे न केल्याने शरीरातील पाण्याचे पर्यायाने लघवीचे प्रमाण घटते त्यामुळे लघवीत क्षार अथवा अन्य घटक विरघळण्याचे प्रमाण घटते. ही स्थिती अधिक काळ राहिल्यास मूतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते. 


 (2)वारंवार मूत्रमार्गात जंतूसंसर्ग होणारे रुग्ण ही मूतखड्याच्या त्रासाला बळी पडलेले दिसतात.

(3) वारंवार होणाऱ्या अपचनामुळे किंवा सततच्या आतड्यांच्या आजारामुळे लघवीवाटे बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण घटते. स्वाभाविकच लघवीतील क्षारांचे प्रमाण वाढते.

मूतखडा : कारणे व उपचार
मूतखडा : कारणे व उपचार 

(४) उष्ण प्रदेशात राहणाऱ्यांना किंवा सतत भट्टीजवळ काम करणाऱ्यांनाही याच कारणाने मूतखडा होण्याची शक्यता अधिक असते.

(५) आम्लपित्त ( ॲसिडिटी) कमी करणारी औषधी सतत उपयोगात आणल्यामुळेही मूतखडयाची समस्या उद्भवू शकते.

(६) काजू, बदाम, चहा, कॉफी, शेंगदाणे, मांसाहार जास्त केल्याने पुरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. लघवीत व रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने खडे तयार होतात.


(७) मूत्रमार्गात कोठेही संसर्ग होऊन पू अथवा सूज असल्यास हळूहळू प्रथिनांचे स्फोटक जमायची क्रिया होते.
(८) कुपोषित लहान मुलांमध्ये 'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे पेशी मरण्याचे प्रमाण जास्त असले. मूत्रमार्गात अशा मृत पेशीभोवती क्षार जमायला मदत होते. अशा मुलांना मुत्राशयात खडा होतो. तसेच जीवनसत्व 'ड' हे जरुरीपेक्षा जास्त सेवन केल्यासही. मुतखडा होऊ शकतो.

(९ ) मूत्रपिंडात लघवी तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही दोष असल्यानेही मुतखडा तयार होऊ शकतो.

मूतखडा : कारणे व उपचार
मूतखडा : कारणे व उपचार 

(१०) स्त्रियांमध्ये गर्भारपणी लघवीचे प्रमाण घटल्याने व कॉल्शयमची अधिक गळती झाल्याने मूतखडयाचा त्रास होऊ शकतो.

(११) आनुवांशिकता, रासायनिक रचनेतील दोष, मूत्रसंस्थेतील दोष, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ अशा काही कारणांनीही मूत्रपिंडात खडे होऊ शकतात.

(१२) दीर्घकाळ कोणतीही हालचाल न करता बिछान्यावर पडलेल्या रुग्णाला मूतखडे होण्याची शक्यता असले.

(१३) काही रुग्णांमध्ये कोणतेही कारण सापडत नाही.

                                                                               इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या ......... !! 

घरगुती उपचार:                      

(१) मुतखड्यामुळे पोटात वेदना सुरु झाल्यास तातडीचा उपाय म्हणून अर्धा कप गरम' पाण्यात साजूक तूप टाकून घ्यावे, साधारण पंधरा मिनिटात पोटदुखी थांबते.


(2) रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्यास उत्तम.


(3) अन्नात जास्त मीठ टाळले पाहिजे, पदार्थावर वरून मीठ घालून घेऊ नये. लोणच्यासारखा खारवलेला पदार्थही टाळावा.

(४) पालक, चुका, टोमॅटो, पत्ताकोबी यांचे आहारातील प्रमाण कमी केले पाहिजे. म्हणजे या पालेभाज्या पूर्ण टाळण्याची गरज नाही मात्र त्या वारंवार खाऊ नयेत.


( ५) हुलग्याचे म्हणजे कुळीथाचे सूप किंवा पिठले करून घ्यावे. खडा लहान होऊन शरीराबाहेर निघून जाण्यास कुळीथ उपयुक्त ठरतो.


धरगुती उपचार हे प्राथमिक उपचार आहेत. वैदयकीय तज्ञांपर्यंत पोहचण्याच्या आधी रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी हे उपचार आहेत.



मूतखडा : कारणे व उपचार मूतखडा : कारणे व उपचार Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 05, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.