जाणून घ्या आळशी व तिरळ्या डोळ्याबद्दल...

डोळ्या बद्दलची अति महत्वाची माहिती......!


तिरळेपणा हे व्यंग नाही, तर डोळ्यांतील नजरेच्या दोषामुळे तयार होणारी डोळ्यांची स्थिती आहे. लहानपणीच मुलांच्या नजरेतील दोष ओळखून योग्य उपचार केले गेले, तर डोळ्यांचा तिरळेपणा किंवा आळशीपणा दूर करता येतो.

डोळा : आळशी व तिरळा
डोळा : आळशी व तिरळा


" लहान मुलांमध्ये दीर्घदृष्टिदोष असू शकतो. मुलांना जवळचे चांगले दिसते, पण दूरचे दिसण्यात काही दोष असतो. हा दीर्घदृष्टिदोष जर वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी सुरू झाला, तर डोळे तिरळे होऊ शकतात. त्यामुळे ज्या लहान मुलांमध्ये तिरळेपणा आहे, त्या सर्वांचा चष्म्याचा नंबर अचूकपणे काढणे गरजेचे असते. बऱ्याचदा 'मूल लहान आहे, मोठे झाल्यावर डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवू' असे म्हटले जाते; परंतु असे करणे पूर्णतः चुकीचे आहे. असे केल्याने मुलांचा त्रासच वाढतो. जेवढ्या लवकर डोळे तपासू, तेवढे चांगलेच आहे. लवकर चष्मा दिला, तर दीर्घदृष्टिदोषमुळे आलेला तिरळेपणा पूर्ण जाऊ शकतो. मात्र तिरळेपणा इतर काही कारणांमुळे आला असेल, तर दुसरा उपचार करावा लागतो. 

आयुर्वेदिक उपाय या Whatsapp ग्रुपला Join होण्यासाठी यावर क्लिक करा ...

आणखी एका प्रकारे तिरळेपणा येऊ शकतो. दोन डोळ्यांच्या नंबरमध्ये खूप फरक असेल, तर त्यामुळेसुद्धा तिरळेपणा येऊ शकतो. या प्रकारात कमी नंबर असलेला डोळाच फक्त 'बघण्या'च्या प्रक्रियेमध्ये भाग घेतो आणि दुसरा जास्त नंबर असलेला, म्हणजे दृष्टी कमी असलेला डोळा तिरळा होतो. अशा परिस्थितीत रुग्णांना योग्य तो चष्म्याचा नंबर देने व गरज लागल्यास शस्त्रक्रिया करणे, असे करावे लागते.

                                                                                   आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!  

लेझी आय !

डोळा : आळशी व तिरळा
डोळा : आळशी व तिरळा

दोन डोळ्यांच्या नंबरमध्ये फरक असल्यास आणि त्या कारणाने नजरेमध्ये फरक असल्यास ज्या डोळ्याचा नंबर जास्त आहे, त्या डोळ्याची नजर कमीच राहते. म्हणजेच ज्याचा नंबर कमी आहे, तोच डोळा काम करतो आणि दुसरा डोळा 'आळशी' होतो. चष्म्याचा योग्य नंबर देऊनही अशा डोळ्यांची नजर सुधारत नाही. अशा वेळेस कधी कधी चांगला डोळा दिवसातील काही तास बंद करण्याचा उपाय योजावा लागतो. चांगला डोळा बंदच केल्यामुळे आळशी डोळ्याला काम करणे म्हणजे 'पाहणे' भाग पडते. त्यामुळे त्याचा आळशीपणा कमी होऊन पाहण्याचे काम करण्याची त्या डोळ्यालाही सवय लागते. त्या डोळ्याला काही विशिष्ट प्रकारचे व्यायामही देता येतात. दीर्घदृष्टिदोष असलेल्यांना किंवा लंबगोलाकार भिंगाचा नंबर असलेल्यांना 'लेझी आय'चा त्रास उद्भवण्याची शक्यता जास्त असते. लहानपणीच योग्य नंबराचा चष्मा लावला, तर हा त्रास टळू शकतो; परंतु बऱ्याचदा एका डोळ्याने चांगले दिसत असल्यामुळे दुसऱ्या डोळ्याने कमी दिसते, हे लक्षातच येत नाही. एकेक डोळा बंद करून पाहिल्यावरच ते लक्षात येते. त्यामुळे चष्मा लागल्यानंतर मुलांच्या 'पाहण्या'कडे आवर्जून पाहायला हवे.

                                                                                    आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!  

'लेझी आय'वर लहान वयातच उपचार करायला हवा. नंतर मोठेपणी त्या डोळ्याची नजर फार सुधारू शकत नाही- आणखी बिघडतही नाही- आहे तशीच राहते.


चष्मा वापरा !

डोळा : आळशी व तिरळा
डोळा : आळशी व तिरळा


लेझी आय किंवा तिरळेपणा ज्यांना होऊ शकतो, त्यांनी म्हणजे लहान वयात दीर्घदृष्टिदोष असलेल्यांनी किंवा लंबगोलाकार भिंगाचा नंबर असलेल्यांनी किंवा दोन्ही डोळ्यांच्या नंबरमध्ये बराच फरक असलेल्यांनी चष्मा जास्तीत जास्त वेळ लावणे गरजेचे आहे. इतरांनी गरजेपुरता चष्मा लावला तरी चालू शकते. ज्यांना चष्मा न लावल्यामुळे डोके दुखणे, डोळे दुखणे असे प्रकार होतात, त्यांनीही चष्मा लावायला हवा. चष्म्यातून बघताना चष्म्याच्या काचेच्या मध्य भागातून बघणे गरजेचे आहे. कडेच्या भागातून बघितल्यास जमीन उंच-सखल दिसणे, वस्तूचा आकार चौकोनी न दिसता निमुळता दिसणे, असे होऊ शकते. काही दिवस चष्मा वापरल्यावर आपले डोळे त्याला सरावतात. जाड चष्म्याचे वजन जास्त असल्याने नाकावर घट्टे पडणे व वजनाचा त्रास होणे, असे होऊ शकते. आजकाल हा त्रास टाळण्यासाठी प्लॅस्टिकचे भिंग फ्रेममध्ये बसवतात. त्याचे वजन कमी असते; परंतु त्याला ओरखडे लवकर पडतात. त्यामुळे त्याचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो. भिंगांची जाडी कमी करण्यासाठी हाय इंडेक्सचे भिंगही वापरता येते. चष्म्याच्या फ्रेमचा आकार चेहऱ्याच्या मापाला बसेल, असा हवा. फ्रेम वेडीवाकडी झाल्यास डोके दुखण्याची तक्रार सुरू होऊ शकते. 

                                                                                         आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 


हे पण नक्की वाचा..............

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे....!

न्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !

 नोकरदारांचा आहार कसा असावा...?



अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या .........


IPL च्या बातम्यासाठी व UPDATE साठी या लिंकवर क्लिक करा !



 

जाणून घ्या आळशी व तिरळ्या डोळ्याबद्दल... जाणून घ्या आळशी व तिरळ्या डोळ्याबद्दल... Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 13, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.