नोकरदारांचा आहार कसा असावा...?

नोकरदारांनी अशी घ्या आहाराची काळजी...!

                                                                                                      Notification ला  Subscribe नक्की करा. 
हल्लीचे जग गतीमान झाले आहे. स्पर्धा एवढी वाढली आहे की, आपल्याला फक्त पळापळ करावी लागत एक आहे. या धावपळीत आहाराकडे दुर्लक्ष होते. अन्न हेच औषध असते. अन्न हेच शक्ती देते . अन्न ही माणसाची मुख्य गरज आहे. मात्र अन्य सुखसोयी मिळवण्यासाठी कष्ट करताना आपण नेमके अन्नाकडे दुर्लक्ष करतो. सकाळी लवकर दिवस सुरू होतो व रात्री उशिरा मावळतो. कसल्याच वेळा नियमितपणे पाळणं आपल्याला शक्य होत नाही.
नोकरदारांचा आहार कसा असावा...?
नोकरदारांचा आहार कसा असावा...?

 नोकरदारांचा आहार असावा तरी कसा? हल्लीच्या गतिमान जीवनपद्धतीत पूरक मात्रेचा (supplements) उपयोग करावा की नाही? जी मंडळी कामानिमित्त नेहमी फिरतीवर असतात, त्यांनी काय खावे? एक खरे की, जेवणाच्या अनियमित वेळा, हॉटेलचे खाणे व तणावपूर्ण जीवनशैली या चुकीच्या जीवनपद्धतीतून आम्लपित्त, मलावरोध, अल्सर व पचनाच्या तक्रारी संभवतात. या विकारांपासून वाचण्यासाठी आहारशैलीत काही सामान्य सूत्रे पाळण्याचा प्रयत्न करायला हवा.

आयुर्वेदिक उपाय या Whatsapp ग्रुपला Join होण्यासाठी यावर क्लिक करा ...

* पाळायची सामान्य सूत्रे  : 

१. सकाळी घर सोडताना भरपेट व उत्तम पोषणमूल्य असलेला नाश्ता करूनच बाहेर पडा.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
भरपेट व उत्तम पोषणमूल्य असलेला नाश्ता

२. मार्केटिंगच्या लोकांनी सकाळी नाश्त्यातच जेवण करून घेणे श्रेयस्कर ठरते.

३. दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित नसल्यास नाश्त्यानंतर दर तीन तासांनी एखादे फळ किंवा शहाळे किंवा ताक किंवा १५-२० ग्रॅम सुकामेवा घ्यावा.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
फळ & सुकामेवा 

४. जेव्हा हॉटेलमध्ये खायचे असेल, तेव्हा स्थानिक थाळी (राइस प्लेट) किंवा दाक्षिणात्य पदार्थ खावेत.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
थाळी

५. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, अशांनी पंजाबी, चायनीज, जंकफूड टाळावे.

६. जेवणाबरोबर शीतपेये, चहा, कॉफी किंवा दारू घेऊ नये.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
शीतपेये, चहा, कॉफी

७. जेवणानंतर लगेच काम असल्यास कर्बोदकांचे प्रमाण कमी असू द्यावे . फक्त पोळी किंवा भाताचा प्रकार घ्यावा . पोळी व भात एकाचभात एकाच जेवणात भरपेटभात एकाच जेवणात भरपेट खाल्ल्यास जेवणानंतर गुंगी येण्याची शक्यता असते.

                                                                                              आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!  

८. दुपारच्या जेवणात गोड पदार्थ टाळावेत. गोड आवडत असेल, तर फ्रूटसॅलड, फ्रूटज्यूस घ्यावा.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
फ्रूटसॅलड

९. ज्यांचे पोट सुटले आहे, त्यांनी मुख्य जेवण कमी करून सॅलड व ताक अधिक प्रमाणात घ्यावे.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
 सॅलड व ताक

१०. इन्फेक्शन व ॲसिडिटी किंवा पचनाच्या विकारांपासून वाचायचे असल्यास घरूनच डबा नेण्याची सवय करावी. 

११. बाहेर खाणे अपरिहार्य असल्यास रेस्टॉरंटपेक्षा घरगुती खानावळ किंवा मेस निवडावी.

१२. कमालीची ॲसिडिटी असणाऱ्यांनी नाश्ता व दुपारच्या जेवणामध्ये (mid-morning); तसेच दुपारचे जेवण व काही रात्रीच्या जेवणामध्ये एक-दोन केळी किंवा कोणतेही सीझनल फळ खावे.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
 केळी & सीझनल फळ

१३. धावपळीमध्ये, थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास चहा-कॉफीपेक्षा शहाळे किंवा फ्रूटज्यूस, सुका मेवा, थंड ज्यूस किंवा आइस्क्रीम या पदार्थांचा वापर करणे अधिक फायद्याचे ठरते.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
शहाळे & फ्रूटज्यूस

१४. स्वतः जवळ सतत आवळा कँडी, राजगिरा लाडू, सुकामेवा, चणे, फुटाणे असे झटपट खाण्यायोग्य पदार्थ ठेवावेत.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
आवळा कँडी

१५. कामाच्या वेळेत चहा-कॉफी प्रमाणाबाहेर होत नाही ना याबाबत दक्षता घ्यावी.

नोकरदारांचा आहार कसा असावा...?
चहा-कॉफी 

ज्यांची लाइफस्टाइल फास्ट आहे, अशांनी प्रोटिन अथवा व्हिटॅमिन मिनरल्सची सप्लिमेंट्स रोज घेण्यास हरकत नाही. निव्वळ जाहिरातींच्या प्रभावाखाली निर्णय न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या पूरक मात्रा घ्याव्यात.

                                                                                             आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!  

Notification ला  Subscribe नक्की करा. 


हे पण नक्की वाचा..............

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे....!

न्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या .........


IPL च्या बातम्यासाठी व UPDATE साठी या लिंकवर क्लिक करा !

नोकरदारांचा आहार कसा असावा...? नोकरदारांचा आहार कसा असावा...? Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 13, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.