Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

ताप हा सर्वाच्याच परिचयाचा रोग होय. ताप येतो तो एकटा कधीच येत नाही. बरोबरीने कधी डोकेदुखी, कधी अंगदुखी, कधी सर्दी-खोकला, कधी जुलाब असे कितीतरी त्रास बरोबरीने घेऊन येतो. 

Fever : तापावरील पथ्थकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!
Fever : तापावरील पथ्थकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

                                           Notification Bell ला  Subscribe नक्की करा. 

अशावेळी तापाच्या सोबतीला कोण आहे, हे लक्षात घेऊन पथ्याहार ठरवला पाहिजे. तापात पेज उत्तम असते. कारण तापात अन्न खाण्याची इच्छा होत नाही.

तापाच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार वेगवेगळी औषधे आहेतच; पण घरगुती व आयुर्वेदिक औषधी, आहाराने तापाचा होणारा त्रास कमी करता येतो.

चुकीचा आहार-विहार केल्याने शरीरात वाढलेले दोष आमांशयात, म्हणजे पोटात जाऊन तेथील पाचक अग्नी नष्ट करतात. त्यामुळे योग्य प्रकारे तयार न झालेला अन्नरस रसधातूबरोबर मिसळून संपूर्ण शरीरात पसरतो. त्याला पचविण्यासाठी मागोमाग अग्नीही जातो, परिणामतः अंग गरम होते, यालाच आपण ताप / fever म्हणतो. 

                                                                                      आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 

Viral fever symptoms : ताप आला की भूक लागत नाही, तोंडाला चव नसते हे आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेले असते. याचे कारण अगदी सरळ आहे. पचनास कारणीभूत असलेला जाठराग्नी संपूर्ण शरीरात दोष पचनासाठी विखुरलेला असतो. नवीन अन्न घेऊन ते पचविण्याची क्षमता शरीरात नसते व म्हणून भूक लागत नाही.

Fever : तापावरील पथ्थकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!
Viral fever symptoms

मुळात ताप, मंदाग्नीमुळे होत असल्याने हलके भोजन किंवा उपवास (काहीही न खाणे) यांचा उपचाराप्रमाणे उपयोग होऊ शकतो. ताप / fever येण्यापूर्वीची लक्षणे दिसावयास सुरवात झाली, की लगेच हलके अन्न किंवा लंघन करावे. लंघनामुळे भूक लागते, शरीरात हलकेपणा येतो, अग्नी पूर्ववत होण्यास मदत मिळते व ज्वराचा नाश होतो.

तापामध्ये करण्याचे उपाय 

🔸 तापामध्ये प्यायचे पाणी औषधीद्रव्यांबरोबर उकळून घेणे चांगले असते, सुंठ, वाळा, रक्तचंदन यांच्यासह उकळलेले पाणी सामान्य तापमानाचे झाल्यावर प्यायल्यास तापातील तहान शांत होते व तापही कमी होतो.

तापामध्ये करण्याचे उपाय 

🔸 तापामध्ये 'यवागू' म्हणजे यव किंवा जवापासून बनविलेली पेज उत्तम असते. सध्या मात्र यव जास्ती प्रमाणात प्रचलित नसल्यामुळे कणीयुक्त तांदळाची यवागू बनवता येते. ही बनविण्याची पद्धत पुढीलप्रमाणे होय-

Viral fever symptoms
तापामध्ये करण्याचे उपाय 

तांदूळ किंचित तुपावर प्रथम भाजून घ्यावेत, त्यात सहापट पाणी घालू शिजवून पातळ लापशी तयार करावी.

• ही यवागू तापामध्ये हितकर असते, मूत्राशयाची शुद्धी करते, तहान शमवते.

🔸 तापात जीभ पांढरी होऊन भूक अजिबात लागत नसल्यास मध घालून तुळशीच्या पानांचा अर्धा चमचा रस सकाळ- संध्याकाळ घेता येतो.

Viral fever symptoms
तापामध्ये करण्याचे उपाय 

🔸 सर्दी, ताप, थंडी वाजत असल्यास व अंग दुखत असल्यास दालचिनीचा इंचभर तुकडा, चार ते पाच लवंग, सुंठीचा छोटा तुकडा व गवती चहा पाण्यात उकळून तयार केलेला चहा सकाळ-संध्याकाळ घेणे चांगले असते.

home remedies for fever
तापामध्ये करण्याचे उपाय 

बिघडलेले पोट : 

जुलाब होतात तेव्हाही अग्नी मंद झालेला असतो, भूक लागत नाही, त्यामुळे पोट बिघडले, की जोवर भूक लागून खायची इच्छा होत नाही तोवर काहीही न खाता फक्त - 

🔸सुंठ आणि बडीशेप टाकून उकळलेले पाणी थोडे थोडे पीत राहणे चांगले असते. 

                                                                                          आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 

•जुलाबामुळे शरीरातील जलांश झपाट्याने कमी होत असतो. तो भरून यावा व डीहायड्रेशनची लक्षणे उद्भवू नयेत यासाठी -

🔸उकळलेल्या पाण्यात थोडे मीठ व साखर मिसळून घेत राहणे चांगले असते. 


•ज्या ठिकाणी प्यायचे स्वच्छ पाणी उपलब्ध नसले तेथे -

🔸पाणी अगोदर सुती कापडातून गाळून घेऊन, तुरटीचा खडा फिरवून रात्रभर ठेवणे व सकाळी वरवरचे स्वच्छ पाणी उकळून घेऊन पिण्यासाठी वापरले तर चालू शकते. 


•जुलाब होत असताना साळीच्या लाह्यांपासून बनविलेला 'लाजमंड' अतिशय उपयुक्त असतो. हा लाजमंड असा बनवता येतो-

🔸साळीच्या लाह्यांच्या १४ पट पाणी घ्यावे व मंद आचेवर एकत्र शिजवावे. लाह्या शिजून अगदी मऊ झाल्या, की अग्नीवरून काढून गाळून घ्यावे. मिळालेल्या द्रवामध्ये चवीनुसार सैंधव, आले, तूप, साखर व कोकम किंवा लिंबू मिसळून प्यायला द्यावे. हा लाजमण्ड चवीला अतिशय रुचकर असतोच, शिवाय याचे पुढीलप्रमाणे अनेक उपयोगही असतात-

Fever : तापावरील पथ्थकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!
तापामध्ये करण्याचे उपाय 

•पचनशक्ती सुधारते.

•लाह्या ताकद देणाऱ्या असल्याने श्रमपरिहार होऊन थकवा दूर होतो.

•ताप आला असता, जुलाब होत असता, सतत तहान लागत असता लाजमण्ड पिणे उत्तम असते.

•चक्कर, जळजळ वगैरे त्रासातही लाजमण्डाचा उपयोग होतो.

अश्या प्रकारे ताप / fever येईल तेव्हा वरील दिलेले उपाय करू शकता, हे तापावरील घरगुती उपाय / home remedies for fever जेणे करून तुम्हाला तापपासून आराम मिळेल .  

                                                                                  आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 

Notification Bell ला  Subscribe नक्की करा. 


हे पण नक्की वाचा..............


ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे....!

उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !

 नोकरदारांचा आहार कसा असावा...?


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या .........


IPL च्या बातम्यासाठी व UPDATE साठी या लिंकवर क्लिक करा !

Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...! Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 15, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.