Slime Body : वजन कमी करून सडपातळ होण्यासाठी घरगुती 7 सोपे उपाय..!

Slime /Healthy body : सध्याच्या जीवनशैलीतील सर्वांना त्रासदायक ठरणारी समस्या आहे ती वजन वाढण्याची. सडपातळ व्हायची प्रत्येकाचीच इच्छा असते, पण ते शक्य होतांना दिसत नाही. किलोकिलोने वजन घटवण्याच्या जाहिराती भुरळ घालतात. काही हजार रुपये खर्च केल्यानंतर काही दिवस वजन कमी होतेही. पण काही दिवसांनी एक तर अशक्तपणा येतो किंवा पुन्हा वजन वाढू लागते. अशक्तपणा येऊ न देता वजन कमी केले पाहिजे.   


Slime Body : वजन कमी करून सडपातळ होण्यासाठी घरगुती 7 सोपे उपाय..!



*  त्यासाठीचे सात सोपे उपाय घरच्या घरी करा.

slime honyasathi gharguti upay 


१) सकाळी उठल्यानंतर लिंबाचा रस व मध घालून ग्लासभर कोमट पाणी प्या. शक्यतो सकाळचा चहा टाळा. शक्यच नसल्यास पाणीसेवनानंतर किमान अर्ध्या तासाने चहा घ्या.   


Slime Body : वजन कमी करून सडपातळ होण्यासाठी घरगुती 7 सोपे उपाय..!




२) दिवसाला दोन ते तीन लिटर म्हणजे किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या. हे पाणी उकळून थंड केलेले असल्यास अधिक उत्तम. शरीरात साठलेली टॉक्सिन्स शरीराबाहेर जाण्यास हे पाणी मदत करील.  


how to make slime at home


३) साखरेचे प्रमाण कमी करा. 'साखरेचे खाणार तो लठ्ठ होणार' ही नवी म्हण लक्षात ठेवा. आपल्या पेशींना ऊर्जा मिळण्यासाठी साखर हवीच. पण अतिरिक्त साखर पचवली जात नाही व तिचे मेदात रुपांतर होते. साखर बंद करू नका, पण साखरेचे प्रमाण कमी करा म्हणजे आपोआप चरबीचे प्रमाण कमी होईल.
   
how to make a slime



४) आहारात विविधता ठेवा. हेल्दी फॅट्सचे सेवन करा, व्हाइट कार्ब्स टाळा, पालेभाज्यांचे आहारातील प्रमाण वाढवा, लीन प्रोटीनचे सेवन करा. तुमच्या आहारात भरपूर फळे असू द्या. वेगवेगळी धान्ये व डाळी जरूर खा. 

 
slime meaning in marathi


आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!

५) खाण्यावर प्रेम करा. आपण खाण्यावर प्रेम करीत नाही, तर ते अधाश्यासारखे खातो. त्याऐवजी पदार्थांचा स्वाद-गंध घेत त्याची चव जिभेवर रेंगाळेल एवढेच खा. एकावेळी भरपूर खाऊ नका. शरीर पचवू शकेल एवढेच माफक खा. दिवसातून तीन वेळा भरपेट खाण्यापेक्षा पाच ते सहा वेळा थोडे थोडे खा. मात्र वजन कमी करण्यासाठी जेवण टाळण्याचा अघोरी उपाय करू नका. एक वेळ जेवण टाळण्याने शरीराचे नुकसानच होते. 
 

Slime honyasathi gharguti sope upay



६) ताणाचे व्यवस्थापन करा. ताण वाढला की वजनही वाढू लागते. म्हणून आपण आपल्या आवडत्या छंदात मन रमवा. मित्रांमध्ये, कुटुंबात अधिक वेळ राहा. स्वतःवर किंवा दुसऱ्यांवर रागावणे टाळा. रोज थोडा वेळ प्राणायाम करा. कामाच्या ठिकाणी बसल्या बसल्या अधूनमधून दीर्घ श्वसन करा. वाहन चालवताना किंवा कामाच्या ठिकाणीही उगाच दुसऱ्यांशी तुलना करीत स्पर्धेची भावना जपू नका. 


slime honyasathi home exercise



७) शरीरावर प्रेम करा. त्यासाठी त्याला व्यायामाची भेट द्या. रोज सकाळी किमान अर्धा तास चाला व अकरा सूर्यनमस्कार घाला. कामाच्या ठिकाणीही किमान तासाभराने जागेवरून उठून एक छोटी फेरी मारा. शारीरिक हालचाली करीत राहणे हाच तुम्ही तंदुरुस्त राहण्याचा परिणामकारक मार्ग आहे.   

slime honyasathi home exercise



🔸 जीवनशैलीत बदल करा :   


slime honyasathi diet and exercise


• माणूस कितीही महत्त्वाकांक्षी असला तरी त्याने आपले मन शांत ठेवण्यास शिकले पाहिजे. कारण मनाचा व पचनसंस्थेचा थेट संबंध असतो.



• जेव्हा आपण काहीही खाऊ तेव्हा ते नीट मन लावून शांत मनाने खावे. खाण्याला महत्त्व देऊन जेवा.



• हळूहळू प्रत्येक घास नीट चावून गिळणे. नाही तर दाताचे काम पोटास करावे लागते.



• वेळच्या वेळी म्हणजे दर चार ते पाच तासांनी थोडा थोडा आहार करणे अत्यंत महत्त्वाचे व फायद्याचे आहे.



• डाएटच्या नावाखाली किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणास्तव अवास्तव उपवास करू नयेत.



• बाहेरचे न शिजवलेले दूषित अन्न कधीही खाऊ नये. हे अगदी १०० टक्के टाळावे. जर खाण्याची वेळ आलीच, तर शिजवलेले अन्नच खावे.



• मद्यपान, धूम्रपान व तंबाखू यामुळे पचनसंस्थेचा कर्करोग होतो हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली गोष्ट आहे. त्यामुळे हे टाळावेच.



• आपला आहार ८० टक्के शाकाहारी असावा. याचे कारण असे, की मांसाहार पचण्यास जड असतो. ज्यामुळे आपण आपल्या पचनसंस्थेवर भार टाकत असतो. •नियमित व्यायाम करावा.


जास्त विचारले जाणारे प्रश्न....

१) सडपातळ होण्यासाठी घरगुती उपाय कोणते ?
२) सडपातळ होण्यासाठी आहार कोणता घ्यावा ?
३) निसर्गोपचाराने वजन कसे कमी करावे ?
४) Slime दिसण्यासाठी टिप्स कोणत्या ?

या सर्वांची उत्तरे वर देण्यात आलेली आहे. तरी लेख लक्ष देऊन वाचा ,त्याचबरोबर तुम्हाला अनेक प्रश्नांनची उत्तरे वर मिळतील. 







Slime Body : वजन कमी करून सडपातळ होण्यासाठी घरगुती 7 सोपे उपाय..! Slime Body : वजन कमी करून सडपातळ होण्यासाठी घरगुती 7 सोपे उपाय..! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on May 07, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.