Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..!

 डोके दुखणे माहीत नाही अशी व्यक्ती सापडणे अवघडच असावे. वेदना वा दुखणे नकोसे वाटणे अगदी साहजिक असते, पण डोकेदुखी खरोखर खूप त्रासदायक असते.

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..!
Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..!

                                      आमच्या Facebook ग्रूपला जॉईन व्हा.... 

Headache meaning : डोकेदुखीचा अर्थ -

आयुर्वेदात डोक्याला उत्तमांग म्हटले आहे, कारण डोके हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू डोक्यात असतो, सर्व संप्रेरकांना चालना देणारी पिच्युटरी ग्रंथी डोक्यात असते, कान-नाक-डोळे वगैरे इंद्रियांचे अधिष्ठानही डोक्यात असते. मेंदूची जास्तीत जास्ती काळजी घ्यायला हवी यात कोणत्याही शास्त्राचे दुमत नसावे.

                                                                                             आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. डोकेदुखीची/headache तीव्रता, कालावधीसुद्धा व्यक्तीनुरूप व कालानुरूप बदलू शकते. म्हणूनच डोकेदुखीवर उपचार करताना अनेक मुद्द्यांवर विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे अचूक निदान करणे खूपच गरजेचे असते. 

Headache Reason : डोकेदुखीची कारणे आयुर्वेदात दिलेली आहेत, ती अशी -

Headache Reason : डोकेदुखीची कारणे
Headache Reason : डोकेदुखीची कारणे

● मल, मूत्र, शिंक वगैरे नैसर्गिक प्रवृत्तींना अडवून ठेवणे. 

● दिवसा झोपणे.

● रात्री जागरण करणे.

● अति मद्यपान किंवा अंमल चढणाऱ्या वस्तूंच्या आहारी जाणे.

● डोक्यावर जोराचा वारा लागणे.

● अतिमैथुन करणे.

● न आवडणारा वास घेणे.

● धूळ, धूर, अतिशय थंडी किंवा कडक उन्हाच्या संपर्कात येणे. 

● पचण्यास जड, आंबट, गोष्टींचे तसेच पुदिना, मिरची वगैरे हरितवर्गातील गोष्टींचे अतिसेवन करणे.

● अतिशय थंड पाणी पिणे. 

● डोक्याला मार लागणे.

● अश्रूंना अडवून ठेवणे किंवा खूप रडणे.

● शरीरात आमदोष वाढणे. 

● आकाशात मेघ दाटून येणे.

● अतिशय मानसिक कष्ट होणे.

● जनपदोध्वंसातील देश आणि काळ बिघडणे.


यातील एक किंवा अनेक कारणांनी वातादी दोष असंतुलित होतात आणि डोक्यात जाऊन तेथील रक्तधातूला दूषित करतात, यातून अनेक प्रकारचे शिरोरोग उत्पन्न होतात, या शिरोरोगांचे मुख्य लक्षण असते, शिरःशूळ अर्थात डोकेदुखी.

                                                                                 आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

Headache Types : डोकेदुखीचे एकूण अकरा प्रकार सांगितलेले आहेत.

Headache Types डोकेदुखीचे प्रकार
Headache Types : डोकेदुखीचे प्रकार 

१. वातदोषामुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये एकाएकी, क्षुल्लक कारणानेसुद्धा डोके खूप दुखू लागते. डोकेदुखी रात्री अधिक वाढते. डोक्यावर गरम वस्त्र आवळून बांधल्याने, तसेच डोक्याला शेक करण्याने या प्रकारचे दुखणे कमी होते.


२. पित्तदोषामुळे डोके दुखते तेव्हा डोके व डोळ्यांची आग होते, श्वास गरम भासतो, दिवसा वेदना वाढतात, तसेच गरम गोष्टी नकोशा वाटतात; डोक्याला थंड स्पर्शाने बरे वाटते; रात्री वेदना कमी होतात.


३. कफदोषामुळे डोके दुखते तेव्हा बरोबरीने डोके जड, जखडल्यासारखे वाटते; चेहऱ्यावर, डोळ्यांखाली सूज आल्यासारखी वाटते; वात- पित्ताच्या मानाने वेदना कमी असतात.


४. तिन्ही दोष बिघडल्यामुळे डोके दुखते तेव्हा वेदना तीव्र असतात, चक्कर येते, डोक्यात दाह होतो, न शमणारी तहान लागते, जडपणा जाणवतो, डोळ्यांवर झापड येते आणि वेदना निरंतर होत राहतात, काहीही करण्याने बरे वाटत नाही.

                                                                                       आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

५. रक्तातील दोषामुळे डोके दुखते तेव्हा इतर लक्षणे पित्तज शिरःशूळाप्रमाणे असतात, फक्त वेदना इतक्या तीव्र असतात की त्यामुळे डोक्याला स्पर्शही सहन होत नाही.


६. क्षयज शिरःशूळ - अपघात वगैरे कारणांनी किंवा शरीरातील स्नेहभाग कमी झाल्याने जो शिरःशूळ होतो तो अतिशय कष्टदायक असतो. यामधील वेदना अतिशय तीव्र असतात.


७. कृमिज शिरःशूळ - डोक्यात कृमी झाल्यानेसुद्धा डोके दुखू शकते. यामध्ये डोक्यात टोचल्यासारखे वाटते, डोक्यात मुंग्या चालत असल्यासारखे वाटते, नाकातून पाणी किंवा क्वचित पू येऊ शकतो. या प्रकारची डोकेदुखी अतिशय कष्टप्रद असते.


८. सूर्यावर्त - वात व पित्तदोषाच्या प्रकोपामुळे तीव्र वेदना होतात त्याला सूर्यावर्त म्हणतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे पहाटे, सूर्योदयाच्या वेळेस डोके व भुवया यांच्या ठिकाणी वेदना सुरू होतात आणि जसजसा सूर्य तीव्र होत जातो तसतशा वेदना वाढत जातात. मध्यान्ही वेदना इतक्या वाढतात की त्यामुळे मनुष्य अगदी मलूल होऊन जातो.दुपारनंतर सूर्य खाली जातो तसतशा वेदना कमी होत जातात आणि सूर्यास्तानंतर वेदना थांबतात.


९. अनन्तवात - वातादी तिन्ही दोष प्रकुपित होऊन मानेत तीव्र वेदना करतात. ही वेदना भुवया, डोळे व शंखप्रदेशापर्यंत पोचते, मान जखडू शकते, हनुवटी जखडू शकते. अनंतवातामुळे विविध प्रकारचे नेत्ररोगसुद्धा होऊ शकतात.


१०. अर्धावभेदक - याला सामान्य भाषेत अर्धशिशी असे म्हणतात. यात डोक्याच्या डाव्या वा उजव्या बाजूला अतिशय तीव्र वेदना होतात. या वेदना इतक्या तीव्र असतात की जणू डोक्यात शस्त्राने प्रहार होत आहेत असे वाटते किंवा ऐरणीतून आग निघत असल्यासारखे वाटते. अर्धावभेदक खूप तीव्र झाला तर त्याचा कान किंवा डोळ्यावर परिणाम होऊ शकतो.


११. शंखक - रक्त, पित्त व वात हे तिन्ही प्रकुपित झाल्याने ही डोकेदुखी होते व इतकी भयंकर असते की तीन दिवसांच्या आत योग्य उपचार न मिळाल्यास व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते.

                                                                                        आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

Headache home remedies / काय कराल ?


डोकेदुखीवर उपचार करण्यापूर्वी नेमके कारण शोधून काढणे सर्वांत महत्त्वाचे असते. बहुतांशी वेळेला डोके दुखायला लागले की केवळ वेदनाशामक उपचार करण्यावर भर दिला जातो, पण त्यामुळे तात्पुरते बरे वाटले तरी पुन्हा पुन्हा डोके दुखू शकते.

🔸 वातामुळे डोके दुखत असल्यास कानात तेल टाकता येते, नाकात तूप घालता येते, डोक्याला वातशामक तेल लावण्याचाही उपयोग होतो.

Headache home remedies

🔶 पित्तामुळे डोके दुखत असल्यास दुधात भिजविलेली आवळकाठी बारीक करून त्याचा डोक्यावर लेप लावल्यास बरे वाटते. दुधात तूप- साखर व थोडे केशर घालून पिण्याचाही फायदा होतो. 

Headache home remedies

🔸 ऊन लागून पित्त वाढत असल्यास कोकमाचे तेल व नारळाचे तेल गरम करून एकत्र करून थंड झाले की डोक्यावर लेप लावल्यास बरे वाटते. 

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..!

🔸 गुलाबपाण्यात चंदन उगाळून त्याचा डोक्यावर लेप लावण्यानेही बरे वाटते.

🔶 कफामुळे डोके दुखत असल्यास आल्याच्या रसात थोडीशी पिंपळी उगाळून त्यात थोडे सैंधव व गूळ मिसळून सेवन करण्याने बरे वाटते. 

Headache Reason : डोकेदुखीची कारणे

🔶 सर्दीमुळे डोके दुखत असल्यास दुधात किंवा पाण्यात दालचिनी उगाळून लेप लावल्यास बरे वाटते. 

Headache Types डोकेदुखीचे प्रकार

🔸 निर्गुडी, कडुनिंब, आघाडा यांचा पाला पाण्यात घालून त्याचा वाफारा घेतल्यानेही कफदोषाशी संबंधित डोकेदुखी दूर व्हायला मदत मिळते.

🔸 रक्तातील दोषामुळे डोके दुखते त्यावर पित्तशामक उपचार करण्याचा उपयोग होतो. शतधौत तूप (म्हणजे शंभर वेळा थंड पाण्याने धुतलेले तूप) डोक्यावर चोळण्याचा फायदा होतो. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन आणि रक्तमोक्षण करून घेण्याचाही फायदा होतो.

Headache Reason : डोकेदुखीची कारणे

🔸 सूर्यावर्तावर सूर्योदयापूर्वी उठून शौच-मुखमार्जन झाले की जिलेबी किंवा पेढ्यासारखा गोड पदार्थ खाऊन वर पाणी पिण्याचा उपयोग होतो असा वृद्धवैद्याधार आहे.

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..!

🔸 अर्धे डोके दुखत असल्यास केशराचा संस्कार केलेले तूप नाकात टाकण्याचा उपयोग होतो. 

🔸 सुपारीच्या झाडाला कधी कधी निसर्गतःच अर्धी सुपारी येते, अशी अर्धी सुपारी पाण्यासह उगाळून तयार केलेला लेप दुखत असणाऱ्या बाजूवर लावण्यानेही अर्धशिशी दूर होते असा वृद्धवैद्याधार आहे.

Headache home remedies

इतर शिरःशूळ म्हणजे क्षयामुळे, कृमींमुळे होणारा शिरःशूळ, अनंतवात, शंखक वगैरेंवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार करणेच आवश्यक असते. कधी कधी मलावरोधामुळे किंवा अपचनामुळेसुद्धा डोके दुखू शकते.तापामुळे, रक्तदाब वाढल्यामुळेसुद्धा डोके दुखू शकते. स्त्रियांच्या बाबतीत डोकेदुखीचा संबंध मासिक पाळीशी निगडित असू शकतो. अंगात उष्णता,कडकी अधिक असणाऱ्यांनाही वारंवार डोकेदुखी/ Head pain होण्याची शक्यता असू शकते. सध्याच्या काळात संगणकावर दीर्घकाळ काम करणाऱ्यांमध्ये,रात्रपाळी करावी लागणाऱ्यांमध्ये, प्रखर प्रकाशात, अति गोंगाटाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्येही डोकेदुखीची प्रवृत्ती वाढते आहे असे दिसते.

                                                                                आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

अश्या पोस्टसाठी आमच्या  Facebook  ग्रुप ला जॉईन व्हा...!

 हे पण नक्की वाचा..............


 Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !

 नोकरदारांचा आहार कसा असावा...?


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या .........


IPL च्या बातम्यासाठी व UPDATE साठी या लिंकवर क्लिक करा !

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..! Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 18, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.