SALT / MITH - मिठाचे आरोग्यावर होणारे फायदे व घातक दुष्परिणाम ! परिणामापासून आरोग्याला सांभाळा



SALT / MITH : एखादी व्यक्ती आपल्याला किती आवडते हे सांगण्यासाठी आपण मिठाचे उदाहरण देऊ शकतो. मिठाचे अनन्यसाधारण महत्व बघता मिठाशिवाय आपल्या जीवनाला रुची नाहीच असेच म्हणावे लागेल. रोजच्या आहारात अन्नाला रुची उत्पन्न करणारा पदार्थ म्हणजे मीठ. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते तसेच खाणीतूनही मीठ काढले जाते.



लवण रस जल आणि आग्नी या महाभुतांच्या आधिक्यातून तयार झालेला आहे. खारट चवीमुळे तोंडाला पाणी सुटते, जिभेला चव येते व अन्नाला मार्दवता येते. लवण रस गरम स्वभावाचा असून पचनानंतर मधुर रसात परिवर्तित होतो म्हणून लवण रसाचे वीर्य उष्ण तर विपाक मधुर असतो; तसेच लवण रस स्निग्ध, गुरू व तीक्ष्ण गुणाचा असतो. लवण रस आपल्या स्निग्ध, उष्ण गुणांनी वाताचे शमन करतो, स्निग्ध व गुरू गुणांनी कफ वाढवतो तर उष्ण गुणाने कफाला पातळ करतो; तसेच उष्ण वीर्य, तीक्ष्ण गुणाने पित्तदोषाला वाढवतो.


हे पण बघा - पित्ताचा त्रास होतोय ? मग नक्की करा हे घरगुती उपाय....

* आयुर्वेदात लवण वर्ग सांगितलेले आहेत. 

त्यामध्ये सैंधव मीठ, पादेलोण, बीडलवण, सांबरमीठ व सामुद्रमीठ याप्रमाणे पाच Salt/ मिठांचे वर्णन असून या सर्व प्रकारांत सैंधव मीठ श्रेष्ठ सांगितलेले आहे.


SALT / MITH - मिठाचे आरोग्यावर होणारे फायदे व घातक दुष्परिणाम ! परिणामापासून आरोग्याला सांभाळा


• सैंधव मीठ :- हे मधुर, लघु व अनुष्ण असून वृष्य, हृद्य व त्रिदोषनाषक, दृष्टीला हितकर व अविदाही आहे. अग्निवर्धक असून लवणकार्यात श्रेष्ठ आहे.

• पादेलोण :- लघु, सुगंधी, कटुविपाकी असून हृदयास बल देणारे, रुच्य व मलावरोध दूर करणारे आहे.

• सामुद्रमीठ :- हे मधुर विपाकी, गुरू म्हणजेच पचण्यास जड असून शरीरात क्लेद उत्पन्न करणारे (शरीरातील स्रावांचे प्रमाण वाढविणारे) आहे.




* लवण रसाचे कार्य 


🔸 आपल्या उष्ण, तीक्ष्ण गुणांमुळे खारट रस शरीरातील कोणत्याही प्रकारचा अडथळा मोडून काढू शकतो. कफदोष, मेद धातू अवाजवी प्रमाणात वाढून शरीरातील चलनवलनास अडथळा आणू लागल्यास लवण / रस तो अडथळा दूर करू शकतो.


🔸 अग्निकृत - तेज महाभुताचे आधिक्य असल्याने; तसेच स्वतःच्या उष्ण गुणांमुळे लवण रस अग्नीला वाढवतो.


🔸 स्नेहन - खारट रस ओलावा निर्माण करीत असल्याने व तीक्ष्ण गुणाने आतपर्यंत पोचवण्यास समर्थ असल्यामुळे तूप, तेल वगैरे स्नेहन करणाऱ्या द्रव्यांना लवण रस सहाय्यक असतो. अर्थात लवण रसासह तूप, तेल स्नेहनाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.


🔸 स्वेदन - लवण रस पित्त वाढवत असल्याने स्वेदनासाठी उपयुक्त ठरतो. उदा. मिठाच्या पुरचुंडीने शेक दिला जातो.


🔸 रोचन - आम्ल रसाप्रमाणेच लवण रसही तोंडाला चव देतो. लवण रसाच्या सेवनाने तोंड, जीभ, घसा वगैरे ठिकाणांतील मलरूप कफदोष काढून टाकून जिभेची संवेदनशीलता वाढते, जेणेकरून अन्नाची चव चांगल्या प्रकारे जाणवू शकते. लवण रस स्वतः तर रुचकर आहेच, पण तो बाकीच्या चवींनाही अधिक प्रभावी बनवू शकतो. उदा. लिंबाच्या रसात मीठ टाकले की ते अधिक रुचकर लागते, तुरट रसाच्या जांभळाला थोडे मीठ लावले तर ते अधिक चविष्ट लागते.  


Salt/Mith : मिठाचा उपयोग आणि फायदे



 शरीरातील वातदोषाचा अडथळा दूर करून मलरूप कफदोषाला पातळ करून काढून टाकण्याचे काम लवण रस करतो. त्यामुळे शरीरशुद्धी प्रक्रियांत विशेषतः वमन म्हणजे उलटीद्वारे विषद्रव्ये बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत / लवण रस आवर्जून वापरला जातो. योग्य प्रकारचा व योग्य प्रमाणात लवण रस वापरल्यास पोट साफ व्हावयासही मदत होते.


 सौवर्चल, सैंधव, सामुद्र, औद्भिद बिड लवण, रोमक, पांसुज लवण व वनस्पतींचे क्षार ही लवण रसाची उदाहरणे होत. यातील सैंधव लवण सर्वश्रेष्ठ होय.


 रोजच्या स्वयंपाकात आपण वापरतो ते सामुद्र मीठ असते. पण आयुर्वेदिक औषधात मात्र मुख्यत्वे सैंधव मीठच वापरले जाते. बाकी सौवर्चल, औद्भिद रोमक वगैरे प्रकारही अनेकदा आयुर्वेदिक औषधात वापरले जातात.




* मिठाचा उपयोग / फायदे :-


Salt/Mith : मिठाचे आरोग्यावर होणारे परिणाम



 पदार्थ टिकविण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो. अन्नपदार्थ सुकविण्यासाठी, मासे वाळविण्यासाठी, लोणची इ. पदार्थ टिकविण्यासाठी मीठ लावून ठेवण्याची पद्धत आहे. मीठ जंतुघ्न असून दातांतील कीड (जंतु) नाहिसे करण्यासाठी, चामडे कमावण्यासाठी मिठाचा वापर करतात.


 शरीरास सूज आली असल्यास, दम्यासारखे विकार, हृदयरोग, रक्तदाब, पोटात पाणी होणे (जलोदर) अशा सर्व विकारांत मीठ वर्ज्य केल्यास चांगला फायदा होतो. अनेक त्वचा विकारांमध्ये मीठ बंद केल्यास त्वरित फायदा पहायला मिळतो.


 कोरडा खोकला असल्यास गरम पाणी, त्यामध्ये दोन चमचे तीळाचे किंवा खोबरेल तेल आणि चिमूटभर सैंधव मीठ घालून प्यायल्यास खोकला त्वरीत कमी होतो.

• जेवणापूर्वी आले व सैंधव मीठ घ्यावे असा संकेत आयुर्वेदात असून त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते व जिभेला चांगली रुची प्राप्त होते.


• मार लागल्यावर, सूज आल्यावर मीठाच्या पुरचुंडीने शेकल्यास सूज कमी होऊन ठणका कमी होतो.


• उचकी लागल्यास सैंधव मिठाचे पाणी तयार करून नाकात दोन-दोन थेंब टाकल्यास तात्काळ उचकी थांबते.


 नाकातील मांस वाढणे, सर्दी डोक्यामध्ये साचून निर्माण होणारी डोकेदुखी यामध्ये सुद्धा सैंधव मिठाचे पाणी नाकात टाकल्यास त्वरीत फायदा होतो.


 अती मात्रेत जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होत असल्यास गरम पाण्यात सैंधव मीठ, पादेलोण व तूप टाकून असे गरम पाणी रात्री झोपताना घेतल्यास पोट साफ होते.


 लघवी अडली असल्यास पोटावर बेंबीच्या खाली मीठाच्या पुरचुंडीने शेक दिल्यास लघवी सुटण्यास मदत होते.

ऋतूनुसार व आवश्यकतेनुसार प्रत्येकाने यथायोग्य प्रमाणात मिठाचा वापर करावा.



* लवणरस (मीठ) अति प्रमाणात खाण्याचे नुकसान :-


लवण रसाचे फायदे आपण पाहिले. मात्र तो अतिप्रमाणात घेतल्यास शरीराचे नुकसानही होऊ शकते. वर पाहिल्याप्रमाणे याच्या अतिसेवनाने पित्ताचा प्रकोप होतो, परिणामतः रक्त दूषित होते, मांसादी धातूत अवाजवी प्रमाणात जल महाभूत वाढल्याने ते शिथिल होतात. शिथिलतेबरोबर अशक्तता येते. हळूहळू ही अशक्तता मज्जा, शुक्र धातूपर्यंत पोचली की स्मृतिनाश, नपुंसकता यासारखे गंभीर परिणाम होतात.     


मिठाचा उपयोग / फायदे



 लवण रसाच्या अतिरेकाने पित्त व रक्त दोघेही बिघडले की रक्तपित्त म्हणजे नाक, तोंड, डोळे, योनीमार्ग वगैरे ठिकाणाहून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते, अंगावर सूज येते, विविध त्वचाविकार, नागीण वगैरे रोग होऊ शकतात.


 आजकाल केस गळणे, अकाली पांढरे होणे, डोक्यात चाई पडणे, केसांची चकाकी नाहीशी होणे असे बहुतांशी सर्वांना भेडसावणारे त्रास लवण रसाच्या अतिरेकाने होऊ शकतात.


 लवण रस शिथिलता उत्पन्न करीत असल्याने याच्या अतिरेकाने त्वचादेखील लवकर सुरकुतते, पित्तप्रकोप झाल्याने असह्य तहान लागणे, तोंड येणे, आम्लपित्त होणे, हातापायांची जळजळ होणे वगैरे प्रकार होऊ शकतात.


 स्वयंपाकात वापरले जाणारे मीठ शिजवले जाणे अत्यावश्यक असते. वरून घेतलेल्या मिठामुळे, म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाही, वरील सर्व दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून पदार्थ शिजवतानाच मीठ घालावे, वरून घेण्याची सवय ठेवू नये. चिवडा, भेळपुरी, पाणीपुरी वगैरे चटकदार गोष्टींचा, ज्यांच्यात मीठ शिजले जात नाही, अतिरेक करू नये.


 अतीमात्रेत सेवन झाल्यास पित्तप्रकोप, रक्त दुष्ट करणारा, मूर्च्छा उत्पन्न करणारा, शरीरातील त्वचा-मांस यांचे तापमान वाढवून त्याचे विदारण करणारा असून त्वचा कुजण्याकडे प्रवृत्ती निर्माण करणारा आहे. यामुळे अनेक त्वचारोग उत्पन्न होऊ शकतात.


 विषवत् परिणाम करणारा, शरीरात सूज उत्पन्न करणारा, निरनिराळे फोड उत्पन्न करणारा, दात लवकर पाडणारा, पुरुषत्व नष्ट करणारा, म्हणजे शुक्रक्षय करणारा, केस गळणे, लवकर पिकणे, त्वचेला सुरकुत्या उत्पन्न करणारा असून रक्तपित्त, विसर्प, वातरक्त इ. गंभीर विकार उत्पन्न करणारा आहे.


 नुकत्याच झालेल्या पाहणीमध्ये असे लक्षात आले आहे की जगातील सर्व पुरुषांची वीर्यातील शुक्राणूंची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. त्याचे कारण अत्यधिक मात्रेत लवण म्हणजे खारट पदार्थ खाण्याची प्रवृत्ती.    


Salt/Mith : मिठाचे अद्भुत परिणाम


• दृष्टिदोष उत्पन्न होणे, डोळ्यांचा नंबर वाढणे, लवकर चष्मा लागणे हे सुद्धा अत्यधिक मात्रेत मीठ खाण्यामुळेच होते. त्यासाठी यथायोग्य प्रमाणात मीठ खाणे आवश्यक आहे. वाटीने लोणचे खाणारे किंवा प्रत्येक घासाबरोबर मीठ खाणारे रुग्ण पहायला मिळतात. अशा सवयी शरीरास घातक ठरतात.


• लवण रस पाचक, क्लेद उत्पन्न करणारा, दीपन (भूक वाढविणारा), तीक्ष्ण, सर गुणाचा (सारक), सर्व शरीरात तत्काळ पसरणारा, मलाविबंध दूर करणारा, वातनाशक, रोचक असून पदार्थात हा अधिक प्रमाणात झाल्यास अन्य रसांची चव घालवून टाकतो व जरा कमी झाला तर पदार्थांची चव लागत नाही.



लवण रस म्हणजे खारटपणा अन्नपदार्थास चव उत्पन्न करणारा आहे. आयुर्वेदात मिठाचा उल्लेख जेथे जेथे केला आहे त्या ठिकाणी सैंधव मीठ वापरावे असा संकेत आहे. Salt /मीठाचा यथायोग्य वापर आहारात करावा. अतिरिक्त वापर शरीरास अपायकारक असतो. प्रामुख्याने उन्हाळ्यात वसंत व ग्रीष्म ऋतूमध्ये Mith /मिठाची आवश्यकता शरीरास थोडी अधिक असते. अन्य ऋतूमध्ये आहारात मिठाचा वापर रुची उत्पन्न करण्याइतकाच करावा.




जास्त विचारले जाणारे प्रश्न....

१) मीठ शरीरासाठी आवश्यक आहे का ?
२) जास्त मीठ खाल्ल्यास काय होईल ?
३) मीठ न खाल्ल्यास काय होईल ?
४) सैंधव मिठाचे फायदे काय ?
५) मिठाचे प्रमाण कसे मोजावे ?

या सर्वांची उत्तरे वर देण्यात आलेली आहे. तरी लेख लक्ष देऊन वाचा ,त्याचबरोबर तुम्हाला अनेक प्रश्नांनची उत्तरे वर मिळतील. 





हे पण नक्की वाचा..............

 Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..! 

आरोग्यदायी खजूर : खजूर खाण्याचे गुणकारी फायदे....   

योगासने आणि व्यायाम यातील फरक व योगासने आणि त्याचे फायदे


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या ......... 

SALT / MITH - मिठाचे आरोग्यावर होणारे फायदे व घातक दुष्परिणाम ! परिणामापासून आरोग्याला सांभाळा SALT / MITH - मिठाचे आरोग्यावर होणारे फायदे व घातक दुष्परिणाम ! परिणामापासून आरोग्याला सांभाळा Reviewed by आयुर्वेदिक उपाय on May 02, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.