उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink

 उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink

आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार केला तर उन्हाळा हा सर्वात अवघड ऋतू होय. वातावरणात वाढलेली उष्णता, त्यामुळे शरीराला येणारा थकवा ,मंदावलेली पचनशक्ती, अशक्तपणा, शिथिल झालेले शरीरधातू या गोष्टींचा उन्हाळ्यात सामना करावा लागतो. पण त्याबरोबरीने मुलांना असलेली सुटी, त्यानिमित्ताने प्रवासाचे बेत, थंड सरबते, आईस्क्रीम खाण्याचा आनंद हवाहवासा वाटतो.उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink महत्वाची ठरतात.

उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink
उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink

भारतीय वैद्यकशास्त्राने ऋतुकाळ व आहार यांचा नीट विचार केला आहे. वातावरणात उष्णता वाढू लागली की, निसर्गातील पाणी आटू लागते. तसे हवेत कोरडेपणा जाणवतो. त्याचवेळी शरीरातील जलतत्वसुद्धा कमी होऊ लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जलतत्वपोषक आहाराचे सेवन करणे आवश्यक ठरते. ऋतूनुरूप आहार घेतला तर आरोग्य टिकून रहायला मदत होते. अशावेळी आहाराच्या वेळा व आहाराचे प्रमाण यालाही खूप महत्व असते.

                                                                                      आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!    

उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink
उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink

उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळे आहार घेतांना एकाचवेळी खूप आहार असू नये. उन्हाळ्यात कधीही पोटाला तडस लागेपर्यंत जेवण घेता कामा नये. असे झाले तर अन्न नीट पचत नाही. दोन जेवणामधील अंतर कमी असू नये तसे ते जास्तही असू नये. उन्हाळ्यात रात्रीचे जेवण खूप उशीरा होणार नाही याची काळजी घ्यावी. रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर व हलके असावे. खूप जड अन्न उन्हाळ्यात त्रासदायक होते. रात्रीच्या वेळी मांसाहार टाळणेच योग्य होईल. बाजारातील शीतपेये पिण्याऐवजी घरच्या घरी बनविलेल्या सरबताचा आनंद घ्यावा.

उन्हाळ्यातील आहार :-              

(1)उन्हाळ्यात रोजच्या आहारात दूध, घरचे ताजे लोणी व तूप यांचा समावेश असावा.

उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink
उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink

2) तांदळाची किंवा रव्याची खीर, गव्हाचा शिरा, दुधी हलवा, नारायाण शिरा, नारळाची बर्फी, साखर-भात  वगैरे पचण्यास हलके पदार्थ खावे.


(3) दुपारचे जेवण वरण-भात, तूप, लिंबू, आमटी, पातळ भाजी, भाकरी किंवा पोळी, दही असे साधे असावे.


(4) मुख्य जेवणात तांदूळ, ज्वारी, नाचणी, गहू या धान्यांचा समावेश असावा.


(5) डाळी, कडधान्यांमध्ये मूग, तूर, मसूर, मटकी असावी.                                     


(6) भाज्यांमध्ये दुधी भोपळा, पडवळ, घोसाळी, दोडकी, भेंडी , काकडी , बटाटा , पालक , इत्यादी असावे.


(7) कोहळ्यापासून तयार केलेला पेठा हाही उत्तम असतो,


(8) उन्हाळ्यात जिरे, धणे, दालचिनी, तमालपत्र, हळद, वेलची, आले हे मसाले जरूर वापरावे.                      


(9) जेवणानंतर सैंधव, पादेलोण व जीरेपूड टाकून केलेले गोड ताक जरूर घ्यावे,



उन्हाळ्यात पाणी पिणे महत्वाचे असते, पण जेवतांना पाण्यानेच पोट भरणार नाही याची काळजी घ्यावी. माठातले पाणी प्यायला हरकत नाही. फ्रीजमधील पाणी टाळावे. 

                                                                                     आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!! 

उन्हाळ्यातील सरबत :- Amazing Summer Beverages You Must Drink To Beat The Heat !

उन्हाळा सुसहय करण्यासाठी उन्हाळ्यातील थंड सरबत आपल्याला मदत करतात. ही सरबत पिण्याचा आनंद अविस्मरणीय असतो. घरी बनविलेली सरबत आरोग्यदायी असतात.

(1) उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी व रसधातूचे पोषण करण्यासाठी कलिंगडचा रस, लिंबू सरबत ,कोकम सरबत, चंदनाचे सरबत, शहाळ्याचे पाणी हेही उत्तम आहे.


(2) उन्हाळी लागली तर कोकम सरबत घ्यावे.


(3) शीत गुणधर्माची द्राक्षे, गोड डाळिंबे, मोसंबी यांचा रस साखरेसह घेता येतो.


(4) आवळ्याच्या ऋतूत ताजे आवळे आणून, चोचवून ते साखरेच्या पाकात टाकून मोरावळा करता येतो .

उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink
उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink

(5) कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यात सर्वांना आवडणारे पेय. कैरी उकळून तिचा गर वेगळा करावा, त्यात पाणी घालून एकजीव मिश्रण तयार करावे. त्यात चवीनुसार साखर, मीठ, जिरे, केशर घालून घोट घोट प्यावे.


(6) उसाचा रस हाही उन्हाळ्यात फार चांगला आहे. पण त्यात अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ टाकलेला नसावा.

(7) मातीच्या छोटया माठामध्ये रात्री ग्लासभर पाणी , वाळा, अनंतमूळ, चंदन,चुरा यांचे थोडेसे मिश्रण भिजत घालावे. सकाळी हे सर्व मिश्रण रवीने घुसळावे व गाळून घ्यावे, त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून प्यावे .


(8) चंदन उगाळून थंड पाण्यात मिसळून व त्यात थोडी  साखर व लिंबू मिसळून सरबत करता येते.

(9) घरच्या घरी बनविलेल्या लस्सीचा वापर करा. 


अशा या सरबतामुळे शरीराबरोबर मनही प्रसन्न होते, पचनशक्ती वाढते व मरगळ दूर होते .

अशा या सरबतामुळे शरीराबरोबर मनही प्रसन्न होते, पचनशक्ती वाढते व मरगळ दूर होते. दिलेले सर्व नीट वाचून जर उपयोगात आणले तर उन्हाळ्यात आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. तसेच उन्हाळ्याचा आनंद घेता येईल. उन्हाळा म्हटलं की , तो आपल्याला नकोसा वाटतो. पण असे विविध उपाय करून त्याला आपण सुखकर बनवू शकतो . उन्हाळ्यात आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. 

                                                                                          आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!! 


हे पण नक्की वाचा..............

उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink उन्हाळ्यातील आहार व पेय-Summer food and drink Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 08, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.