खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

खोकला घरगुती उपायांनी कायमचा करा बरा..

Home Remedies for Cough : वातावरणातील बदलांनंतर काही वेळा आपल्या प्रत्येकाला खोकला होत असतो. पण जर खोकला वरचेवर होत असेल आणि तो टिकून राहत असेल तर वैद्याचा सल्ला घेणेचं उत्तम. खोकला हा साधा वाटला तरी खोकल्याची उपेक्षा ही रुग्णास क्षयापर्यंत नेऊ शकते. खोकला पुर्णपणे बरा होण्यासाठी योग्य उपचार करणे भाग असते.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

निरोगी व्यक्तीला प्रकृतिनुरूप आहार हा औषधासारखा असतो. मात्र रोग झाला तर तो बरा होण्यासाठी औषधाच्या बरोबरीने औषधांनी संस्कारित अन्नाची योजना अधिक चांगली व गुण देणारी असते.

खोकल्याचे अनेक प्रकार असतात : 

कधी खोकला कोरड्या प्रकारचा असतो तर कधी ठसका लागल्याप्रमाणे खोकला येतो. कधी फक्त रात्रीच खोकला येतो तर कधी ठसक्याची ढास लागली तर खोकला थांबता थांबत नाही .

आर्युवेदातही खोकल्याचे वातज, पित्तज , कफज असे प्रकार सांगितले आहेत.

                                                                                           आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!! 

• वाताचा खोकला :

वाताचा खोकला म्हणजे कोरडा खोकला यात कफ पडत नाही पण छाती, पोट, बरगड्या या ठिकाणी खूप वेदना असतात. अश्यावेळी औषधोपचाराइतकाच आहारही महत्वाचा असतो.

(1) तांदूळ व तीळ ही दोन्ही द्रव्ये समभाग घेऊन दुधात शिजवून तयार केलेली खीर प्यावी.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

(2) आहारात चाकवत, मुळ्याची पाने, चांगेरीची पाने, तिळाचे तेल इत्यादींचा समावेश करावा .

(3) दूध - गूळ-उसाचा रस यापासून बनविलेले पदार्थ, कांजी, आंबट फळांचा रस (डाळिंब, आमसूल वगैरे). सैंधव मीठ वगैरे द्रव्यांचा आहारात अधिकाधिक समावेश करावा .

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

(4) मांसाहारी व्यक्तीना मासे, कोंबडी यांच्यापासून बनविलेले सूप, तूप आणि सैंधव मीठ मिसळून होता येते. 

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

• पित्ताचा खोकला :

खोकल्याचा दुसरा प्रकार असतो-पित्तज, यात खोकताना  कफाबरोबर पित्त पडते, डोळ्यांसमोर काजवे चमकतात, तोंडात कडू चव लागते, वारंवार फार तहान लागते, चक्कर येते. 

(1) या प्रकारच्या खोकल्यात मुगाच्या सुपाबरोबर जवाचा भात, वरईचा भात खायला देतात.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

(2) काकोली, बृहती, मेदा, महामेदा, अडुळसा, सुंठ या द्रव्यांचा काढा करून त्यात तांदूळ, मूग वगैरे धान्य शिजवून तयार केलेले सूप पित्तज कफात उपयुक्त असते.

•कफाचा खोकला :

या खोकल्यात दाट आणि अधिक प्रमाणात कफ पडतो, बरोबरीने तोंडाला चव नसणे, शरीरात जडपणा, मळमळ, भूक न लागणे वगैरे लक्षणे जाणवतात.

(1) या प्रकारच्या खोकल्यात कुळीथ किंवा मुगाचे सुप घ्यावे.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

(2) पिंपळी आणि यवक्षारयुक्त कुळथाचे सूप किंवा मुळ्याचे सूप करून त्याबरोबर लघू अन्न म्हणजे तांदळाचा भात किंवा भगरीचे भात वगैरे खावे.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

(3) मधाचे पाणी किंवा आंबट डाळिंबाचा रस, गरम पाणी, ताक यापैकी एखादे पेय घ्यावे.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

(4) पुष्करमूळ, आरग्वधाचे मूळ व पटोल या तिन्ही वनस्पती समप्रमाणात घेऊन कुटून रात्रभर पाण्यात भिजवाव्यात, सकाळी हाताने कुस्करून गाळून घ्यावे व त्यात मध मिसळावा हे पाणी जेवणाच्या सुरुवातीला, मध्यात व शेवटी घ्यावे.

                                                                                         आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!! 

🔴 सर्व प्रकारच्या खोकल्यावर रामबाण उपाय :

◾आवळ्याचा कल्क आणि डाळिंबाचा रस मिसळून तयार केलेले मुगाचे सूप घेतले तर सर्व प्रकारचा खोकला बरा होतो.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!

◾हळद, मिरेपूड आणि मध यांचे मिश्रण करून ते चाटण्याने सुद्धा सर्व प्रकारचा खोकला बरा होतो. 

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
हळद, मिरेपूड,मध

◾कंटकारी नावाची वनस्पती ही खोकल्यावर उत्तम समजली जाते. ही वनस्पती ताजी मिळाली तर तिच्या रसात आणि कोरडी मिळाली तर तिच्या काढ्यात मूग शिजवून बनविलेले सूप सर्व प्रकारच्या खोकल्यावर औषध म्हणून उत्तम असते.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
कंटकारी वनस्पती

•आले, सुंठ : - सुंठ उगाळून तयार केलेल्या चाटणात खडीसाखर घालून, शिजवून केलेला पाक थोडा थोडा चाटण्याने लगेच बरे वाटते .

-सुंठीचा तुकडा टाकून उकळलेले पाणी सुद्धा उपयुक्त असते.

-दम लागल्यास आल्याचा रस व मध यांचे चाटण चाटण्याने बरे वाटते .

-स्वयंपाकात मिरचीऐवजी आल्याचा अधिक वापर करणे हेही फुफ्फुसांसाठी हितावह असते .

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
आले, सुंठ

•ओवा : -ओवा, जेष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी जेवणानंतर खाण्याने खोकला येण्यास प्रतिबंध होतो.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
ओवा, जेष्ठमध

• गवती चहा : गवती चहा, ज्येष्ठमध, दालचिनी, तुळशी, पुदिना यांचा काढा थोडीशी साखर टाकून पिण्याने सर्दी, खोकला व श्वासाशी संबंधित त्रास सहसा होत नाहीत.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
गवती चहा

•तुळशी : तुळशीचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा घेतल्यास छातीत भरलेला कफ सुटण्यास मदत होते. 

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
तुळशी

•लवंग :-लवंग दम्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते. लवंग चघळण्याने दम लागत नाही, ठसका लागून खोकला येणे बंद होते.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
लवंग

•ज्येष्ठमध :- हे फुप्फुसांसाठी उत्कृष्ट औषध होय. नुसत्या ज्येष्ठमधाचा काढा घेता येतो किंवा ज्येष्ठमध, पिकलेले अडुळशाचे पान आणि एक बेहडा यांचा काढा घेण्याने खोकला बरा होतो.

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
ज्येष्ठमध 

•रुईची पाने :- रुईच्या पानांनी छातीवर शेक करणे हे श्वसनसंस्थेसाठी उत्तम असते. छातीत कफ भरला असता, दम लागत असता अगोदर छातीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेक केल्यास वात कफ दोष संतुलित होतात व लगेच बरे वाटते .

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!!
रुईची पाने

🔸खोकल्यामध्ये पथ्यकर अन्न :

तांदूळ, गहू, जव, वरई, मूग, नाचणी, कुळीथ, बकरीचे तूप, बकरीचे दूध, वांगे, मुळा, वेलची, लसूण, गरम पाणी, मिरी, आले-सुंठ, मध, महाळुंग, डाळिंब, लाह्या, आसव-अरिष्ट, आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले मद्य वगैरे.

🔸खोकल्यामध्ये अपथ्यकर अन्न :

विविध प्रकारचे कंद, मासे, पचण्यास जड अन्न, थंड पदार्थ, थंड पाणी, कोरडे अन्न, मका, वाटाणे, वाल, दही, तळलेले पदार्थ, चिंच वगैरे.

खोकला हा रोग नसून घसा व फुफ्फुसाची बिघडलेली परिस्थिती सांगणारी अवस्था असल्याने औषधोपचार घेण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य ठरते. कारण लक्षणामागचे मूळ कारण समजणे व आजारास योग्य उपचार वेळेत मिळणे खूप आवश्यक असते.

                                                                                            आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!! 

हे पण नक्की वाचा..............

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!! खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!!! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 09, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.