शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे

शहद के फायदे-मधाचे आरोग्यदायी फायदे 

अन्नाचा आनंद घेण्यासाठी त्यातील 'रसस्वाद' महत्वाचा असतो. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट हे सहा रस आहेत. आहारात या सहाही रसांचा समावेश असावा. शहद के फायदे-honey benefits-मधाचे आरोग्यदायी फायदे आरोग्याच्या दृष्टीने हे सहाही रस उचित प्रमाणात घेणे आवश्यक असते. पण त्यात गोड रस अर्थात मधुर रस हा श्रेष्ठ असतो . साखर, गूळ व मध योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने सेवन केले तर आरोग्य, प्रतिकारशक्ती उत्तम राहते.

शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे
शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे 

शरीराला मधुर रसाची नितांत आवश्यकता असली तरी साखर व गुळाचे सेवन हे प्रत्येकाच्या प्रकृतिनुसार किवा ते पचवण्याच्या शक्तीनुसार त्याचा वापर करायचा असतो.  मध गोड असल्याने त्याची तुलना साखरेशी करता येणार नाही. तर मधाचे विशेष गुणधर्म आहेत.

                                                                                          आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!   

मध औषधाचे काम करतो. तसेच मध पचण्यासाठी त्यात विशेष घटक असतात. मध शीतवीर्याचा असून त्यामध्ये काही विशिष्ट संप्रेरके असतात. या संप्रेरकांमुळे अन्नाचे धातूमध्ये रूपांतर व्हायला मदत होते. त्यामुळे खाल्लेल्या वस्तूंचे सातही धातूंपर्यंत रूपांतर व्हायला मदत होते. म्हणूनच मधाला 'योगवाही' म्हटले जाते. मध ज्या औषधासोबत खाल्ला जाईल त्या औषधाचा गुण वाढवतो. मध स्वतः सूक्ष्म-गुणाने युक्त असल्याने स्वतःबरोबर औषधाचा गुणही शरीरातील पेशी-पेशीपर्यंत पोहचवतो.शहद के फायदे-honey benefits-मधाचे आरोग्यदायी फायदे 

मध कफनाशक असल्याने खोकला, सर्दी, दमा किंवा फुफ्फुसांशी संबंधित विकारांवर औषध मधाबरोबर दिले जाते.मधुमेहावरील काही औषधे मधासोबत घ्यायची असतात.

शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे
शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे 

मधाच्या नावातच मधुरता लपलेली आहे. मधमाशांनी फुलांमधून गोळा केलेला मध अमृतोपम असतो, असे म्हणायला हरकत नाही. मध औषध म्हणून तर वापरला जातो पण रोज एक-दोन चमचे मध घेणे आरोग्यासाठी उत्कृष्ट असतो.

मधाचे गुणधर्म:

(1) मध वीर्याने शीत असतो.मध गरम करणे, गरम वस्तूंबरोबर घेणे अहितकारक असते.  

                                           

(2)मध पचण्यास हलका असतो. मधमाश्यांकरवी तयार झाल्याने मधामध्ये हा गुण आलेला असतो.


(3) मध चवीला गोड असतो. तसेच त्याचा अनुरस तुरट असतो. मध खाऊन झाल्यास तोंडात तुरट चव जाणवते.

               

(4)मध शरीरातील अतिरिक्त ओलावा, चिकटपणा शोषून घेतो.

                                                                                             आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!  

(5) मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतो.

                                             

(6)मध हे कफदोषावर सर्वश्रेष्ठ औषध असल्याने डोळ्यांसाठीही हितकर असतो.

शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे
शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे 

(7) शरीरात साठलेला अनावश्यक मेदधातू पचवण्यासाठी मध उत्तम असतो. यासाठी जुना मध अधिक गुणकारी असतो. 

(8)साधारणत: गोड चवीचे पदार्थ पचण्यास जड असतात. मध मात्र तयार होत असतांना मधमाश्यांमधील पाचक द्रव्यांनी संस्कारित होत असल्याने अग्नी प्रदीप्त करण्यास मदत करतो.


(9)तोंडातील चिकटपणा दूर करून रूची आणण्यास मदत करतो.  


(10) मधामध्ये जंतुनाशक गुण असतो, त्यामुळे तो खराब, न भरणारी जखम शुद्ध करून भरून आणण्यासाठी उपयोगी असतो. जखमेतील पू, दुर्गधी मधाच्या प्रयोगाने नाश होते.


(11) शरीरातील सर्व स्त्रोतसांची शुद्धी मधामुळे होत असते म्हणूनच रक्ताभिसरण वाढवणारी, चेतातंतूचे काम सुधारणारी औषधे मधासोबत घ्यायची असतात.


(12)मध हा सूक्ष्म गुणाने युक्त असल्याने मध अगदी लहानातील लहान नाडीमार्फत शरीरात सर्वत्र पसरू शकते. मधासह मिसळलेले औषध जिभेच्या संपर्कात आल्या आल्या लगेच कामाला लागत ते त्याच्या सूक्ष्म गुणामुळेच.


(13) मध मृदू म्हणजे नाजूक, मऊ प्रकृतीचा असतो.


(14)मध त्वचेची कांती सुधारणारा असतो. मध सेवन करण्याने रक्ताची शुद्धी होऊन त्वचारोगावर हितावह असतो. तसेच बाहेरून लावण्यानेही त्वचा उजळवण्यास मदत करतो.


(15) शरीरातील अतिरिक्त कफदोष कमी करणारा, अग्नीला ताकत देणारा तसेच सर्व नाड्यांची शुद्धी करणारा असल्याने मध आकलनशक्ती सुधारण्यास सहाय्यक असतो.


(16) शुद्ध मध बोटाला चिकट लागला तरी चमचा, बाटलीच्या कडेला चिकटून राहत नाही तो त्याच्या 'विशद' म्हणजे शुद्ध करण्याच्या गुणामुळे. तोंडातील चिकटपणा किंवा जिभेचा जडपणा मधाच्या या गुणामुळेच नष्ट होतो.

(17) मध रसायन गुणांनी युक्त असून शुक्रधातूसाठी हितकर असतो.

शहद के फायदे-honey benefits-मधाचे आरोग्यदायी फायदे 

                                                                                                   आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!

अशा या गुणकारी मधाचे अनेक औषधी उपयोगही आहेत:

शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे
शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे 

औषधी उपयोग :

(1) शरीरातील शिथिलता दूर करून घातूंना घट्ट बनविण्याचे काम मधामुळे होते.


(2) दही, दूध, तूप, साखर व मध यांपासून बनविलेले पंचामृत सेवन करण्याने मनुष्याला स्मृती, मेधा व ताकद प्राप्त होते.

(3) तूप व मध यांचे मिश्रण अमृतासमान समजले जाते.


(4) तूप व मध घालून केळे खाल्ले तर केळयाचा कफ नडत नाही व शौचाला साफ होते.


(5) मध डोळ्यात घातल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.


(6) पोटात मळमळून अस्वस्थ वाटत असेल तर आले-लिंबाचा रस व मध हे मिश्रण घेण्याने बरे वाटते.


(7) तोंड आले असता मध व पाण्याच्या गुळण्या करण्याने फायदा होतो.


(8) भाजले असता त्यावर ताबडतोब मध लावल्याने फोड न येता त्वचा पुर्ववत होण्यास मदत मिळते.


(9) चेहऱ्यावर मध लावल्यास त्वचा उजळते व चेहरा कोमल दिसू लागतो.

शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे
शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे 

(10) जखम सहजासहजी भरत नसल्यास मच-तूपाचे मिश्रण लावल्यास उपयोग होतो.


(11) मधुमेहावरील काही औषधे मधासमवेत घ्यायची असतात.


असा हा मध शरीरशक्ती व प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी ठरतो.



                                                                                                  आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!! 

हे पण नक्की वाचा..............







शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे शहद के फायदे - honey benefits - मधाचे आरोग्यदायी फायदे Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 07, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.