Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे, नक्की वाचा...!

भेंडीचे आरोग्यवर्धक गुणकारी फायदे..... 

Health Benefits Of Eating Bhindi : भेंडीची भाजी लहान मुलांना खुप आवडते. लहान मुलं ती आवडीन खात असतात. तरुणांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांना भेंडीची भाजी खुप आवडते. पातळ भाजी सोबत उदा. वरणभात,कढी, आमटी , पातळ खिचडी, सूप यासोबत केलेली भेंडीची भाजी किंवा भरलेली भेंडी ही आनंदाने खाल्ली जाते. लग्न-समारंभात जेवणात असलेली भरलेली भेंडी जेवणाची शान वाढवते, अशी ही सात्विक व पौष्टिक भेंडी खातांना आनंदच होतो.

Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!
Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!

भेंडी थोडी उष्ण असली तरी तिच्यातील चिकटपणामुळे ती गरम पडत नाही. ती सर्व प्रकृतींच्या लोकांसाठी हितकर असते. ती रूचकर असून शुक्रधातूवर्धक द्रव्यांमध्ये श्रेष्ठ असते.

भाजीसाठी भेंडीची फळे वापरतात पण औषधात मात्र भेंडीची पाने व मुळे ही वापरली जातात. भेंडी ताजी व टोकाच्या बाजूने वाकवल्यास सहजतेने तुटणारी असावी. 

                                                                                        आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

🔸 भेंडीमधील औषधी गुणधर्म :-


(1) भेंडीमधला चिकटपणा शरीरातील कोरडेपणा कमी करण्यास उपयुक्त असतो.

(2) चेहण्याची त्वचा फार कोरडी होत असेल तर कोवळ्या भेंड्या खलबत्यामध्ये बारीक वाटून तयार झालेला लेप चेहयावर 10 मिनिटांसाठी लावून ठेवण्याचा उपयोग होतो. यामुळे त्वचेचे पोषण होण्यास व चेहऱ्यावर तुकतुकीतपणा येण्यासही मदत होते.

Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!
भेंडीमधील औषधी गुणधर्म

(3) शरीरावर कुठेही गळू आले असेल किंवा नखुरडे झाले असेल तर ते पिकण्यासाठी भेंडी कुटून तयार केलेल्या पेस्ट मध्ये हळद आणि मीठ मिसळून ते मंद आचेवर गरम करून गरम लागेल, पण अगदीच असह्य चटका बसणार  नाही अशाप्रकारे बांधून ठेवता येते. यामुळे गळू लवकर पिकून पू काढून टाकता येतो.


(4) वारंवार शौचाला होणे, गुदभागी आग होणे, कधी बांधून तर कधी पातळ शौच होणे वगैरे अशा तक्रारींवर जिरे, बडीशेप, धने, हळद, कोकम वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरून तयार केलेली भाजी व ज्वारीची भाकरी चांगले असते.

Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!
भेंडीमधील औषधी गुणधर्म

(5) पोटात, आतड्यांचा अल्सर असला तर बऱ्याचशा गोष्टी खाता येत नाहीत. अशावेळी तिखट न घालता भेंडीची भाजी खाणे पथ्यकर असते.

Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!
भेंडीचे आरोग्यदायी फायदे 

(6) भेंडी शुक्रधातूवर्धक असल्याने गर्भधारणेपूर्वी उभयतांच्या आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश असावा.

                                                                                            आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

(7) अकाली शुक्रस्त्रावाच्या तक्रारीवर रोज सकाळी 3-4 कोवळ्या भेंड्या चावून खाव्यात असा वैद्याधार आहे. मात्र त्यासाठी भेंडी कोणतेही रासायनिक खत किंवा फवाऱ्याशिवाय तयार केलेली असावी.

Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!
भेंडीचे आरोग्यदायी फायदे 

(8) तापानंतर किंवा कोणत्याही मोठ्या आजारपणानंतर, आलेला थकवा कमी करण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश आवर्जुन असावा.

(9) घशात कफ चिकटून राहिल्यासारखे वाटत असेल, सारखे खाकरावे लागत असेल, घशाला सूज येऊन घसा दुखत असेल, तर भेंडीच्या काढ्याच्या गुळण्या करण्याने बरे वाटते. यासाठी दोन ग्लास पाण्यात २-३ भेंड्या टाकून मंद आचेवर निम्मे होईपर्यंत उकळावे. जरा निवले की कुस्करून घ्यावे व त्यात एक चमचा मध, पाव चमचा सैंधव, दोन चिमूट हळद मिसळावी व थोडे गरम असतानाच गुळण्या कराव्यात.

Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!
भेंडीमधील औषधी गुणधर्म

(10) भेंडीची पाने सहजासहजी मिळत नाहीत, पण मिळाल्यास त्यांचा केस धुण्यासाठी उपयोग करता येतो. रिठे, शिकेकाईच्या बरोबरीने भेंडीची १-२ पाने कुस्करून टाकावी. हे मिश्रण रात्रभर भिजवून सकाळी उकळी आणली व गाळून घेऊन केस धुण्यासाठी वापरले तर कोंडा कमी होतो व केसांवर तकाकी येते.

Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!
भेंडीचे आरोग्यदायी फायदे 

(11) आमवातामध्ये भेंडीचे मूळ खडीसाखरेसह देण्याचा वृद्ध वैद्याधार आहे. यासाठी भेंडीचे मूळ वाळवून त्याचे चूर्ण करून ठेवता येते व अर्धा-अर्धा चमचा या प्रमाणात खडीसाखरेसह मिसळून दोन वेळा घेता येते.

Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे , नक्की वाचा...!
भेंडीमधील औषधी गुणधर्म

(12) भेंडीच्या मुळाचे चूर्ण अर्धा चमचा आणि धायटीच्या फुलांचे चूर्ण अर्धा चमचा हे मिश्रण तांदळाच्या धुवणासह दिवसातून २-३ वेळा घेण्याने स्त्रियांच्या अंगावरून जाण्याचा त्रास कमी होतो. पांढरे जाणे किंवा अतिरिक्त स्त्राव होणे या दोन्ही तक्रारींवर हे गुणकारी ठरते.

अश्या प्रकारे भेंडी पासून आपल्याला आरोग्यवर्धक गुणकारी फायदे मिळतात. 

                                                                                      आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!


हे पण नक्की वाचा..............


इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या ......... !! 


Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे, नक्की वाचा...! Benefits Of Bhindi : भेंडीचे आरोग्यदायी फायदे, नक्की वाचा...! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 10, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.