Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे.

 शेवगाच्या शेंगाचे आयुर्वेदिक रहस्य....!!

शेवग्याच्या शेंगा भाजीत किंवा आमटीत टाकण्याची पद्धत आहे. शेवग्याच्या पानांची, फुलांची भाजीही करून खातात. अनेक आजारांत शेवगा औषधासारखा गुणकारी आहे. शेवग्याच्या पानांची पूड करून ती नुसती खाण्याने किंवा तिचा चहा करून पिण्याने अनेकानेक फायदे मिळतात. असे आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. अशा या आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे यांची माहिती करून घेऊया.

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे

शेवग्याचे मध्यम आकाराचे झाड असते. याचे खोड ठिसूळ असते, पाने छोटी छोटी असतात. फुले पांढऱ्या रंगाची असतात. लाल रंगाच्या फुलांचाही शेवगा असतो. पण तो दुर्मिळ आहे . शेंगा एक ते दीड फूट लांबीच्या, बोटाएवढ्या जाडीच्या असतात. शेवग्याच्या कोवळ्या शेंगा भाजीसाठी किंवा आमटी-कढीमध्ये टाकण्याची पद्धत असते . जून शेंगा पित्तकर असतात, त्यामुळे त्या टाळणेच इष्ट. शेवग्याच्या कोवळ्या पानांची व फुलांची भाजी केली जाते.

शेवग्याच्या शेंगा भूक वाढवणाऱ्या असतात. तसेच तापातही हितकारक असतात. त्यामुळे तापात थोडी भूक लागू लागली की, शेवग्याच्या शेंगांची भाजी तोंडी लावायला घेणे हितकर असते.

                                                                                            आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!        

🔸 शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे :-

(1) तापात भूक लागली असता तुपामध्ये जिरे, आले, हळद यांची फोडणी करून त्यात शेवग्याच्या शेंगांचे दोन- दोन इंचाचे तुकडे घालावेत पुरेसे पाणी व मीठ घालून शेंगा शिजू द्याव्यात. शेंग आतून शिजली की वरुन मिरपूड व लिंबू पिळून खायला द्यावी.

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे

 (2) शेवगा उत्तम वातशामक असतो. त्यामुळे तोंड वाकडे होणे, अर्धांगवायु या रोगांमध्ये मुगाच्या कढणामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून बनविलेले सूप आठवडयातून दोन- तीन वेळा घेत राहणे श्रेयस्कर असते .


(3) काढा करण्यासाठी शेवग्याची एक कोवळी शेंग घेऊन तिचे छोटे तुकडे करावे. दोन ग्लास पाण्यात उकळण्यास ठेवावे. अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहिले की हाताने कोळून घेऊन गाळून घ्यावे.

                                                                                              आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

(4) चेहरा वाकडा होणे, चेहाऱ्याचे स्नायू शिथिल होणे या तक्रारीवर शेवग्याच्या शेंगाचा काढा तोंडात धरून ठेवण्याचाही उपयोग होतो .


Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

(5 ) याच काढयात अर्थाचमचा हळद व चवीनुसार सैंधव मिसळून त्याच्या गुळण्या केल्याने घसा खवखवणे, दुखणे, सतत खाकरावा लागणे, अतिप्रमाणात लाळ सुटणे अशा तक्रारीवर फायदा होतो.


(6) हिवाळ्यात थंडीमुळे सांधे दुखू लागले किंवा मुका मार लागल्यामुळे अंग दुखत असेल तर शेवग्याच्या शेंगापासून तयार केलेल्या काढयात पाव चमचा सुंठ पूड, पाव चमचा ओवा पूड, चवीनुसार सैंधव मीठ मिसळून पिण्याने वेदना कमी होण्यास मदत मिळते.

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

(7) स्त्रियांमध्ये पाळी उशिरा येणे, रक्तस्त्राव कमी प्रमाणात होणे, पाळी येण्याआधी किंवा पाळीदरम्यान पोट-कंबर दुखणे वगैरे तक्रारी असतांना शेवग्याच्या शेंगांचा काढा करून त्यात बडीशेप व जिरेपूड मिसळून घेण्याने बरे वाटते.  

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

(8) शेवग्याच्या शेंगा जंतावर औषधाप्रमाणे गुणकारी असतात.

                                                                                     आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

 (9) चेहऱ्यावर तसेच त्वचेवर पांढरट डाग पडणे , अन्न अंगी न लागणे, वारंवार सर्दी-ताप-खोकला होणे अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे असतांना आहारात शेवग्याच्या शेंगा ठेवण्याने उपयोग होतो.

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

(10) शेवग्याच्या झाडाची पाने वाफवून त्याचा शेक केला असता, दुखणाऱ्या सांध्यांमध्ये आराम मिळतो.

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

(11) डोके जड होऊन दुखत असेल, सायनसमध्ये कफ साठून राहिला असेल, तर शेवग्याच्या पानांचा रस कपाळावर जिरवण्याने लागलीच बरे वाटते.

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

(12) जखम पटकन बरी होत नसेल, उलट त्यात पू, चकटपणा तयार होत असेल, तर शेवग्याची पाने बारीक वाटून तयार केलेली चटणी जखमेवर बांधून ठेवण्याचा उपयोग होतो .

(13) वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे उत्तम असते.

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे
Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे


                                                                                              आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!


Notification ला  Subscribe नक्की करा. ❤
 
हे पण नक्की वाचा..............









Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे. Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे. Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 10, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.