हा आहार घेऊन उष्मघाताचा धोका टाळा - heat stroke

लिंबू, संत्री, मोसंबीचा वापर करा : तेलकट, मसाले पदार्थ टाळा ...! 

उष्मघातापासून बचाव करतांना आहार मुख्य घटक ठरतो. वाढत्या तापमानाचा सामना करताना डोक्याला रुमाल बांधणे, भरपूर पाणी पिणे या सामान्य बाबींची काळजी घेत असताना आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा, कैरी या व्हिटॅमिन 'सी'चा आहारात समावेश आवश्यक आहे. 





आहार जास्त तेलयुक्त नसावा, तिखट, मसालेदार नसावा. साधा आहार जसे चपाती, भाकरी घेतल्यास उत्तम, भात-वरण, पालेभाजीची भाजी, मोड आलेल्या कडधान्याचा वापर करावा , असा सल्ला आहार तज्ज्ञानी दिला आहे. सर्वदूर गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. ४५.९ पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. पण मे महिना म्हणजे उन्हामुळे अंगाची लाहीलाही करणाराच असतो. यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. अत्यंत गरम होणे,घामोळ्या येणे, अस्वस्त वाटणे असे अनेक त्रास होत आहेत . 


unhalyatil aahar va pey



शरीरास घाम येतो व शरीरातील क्षार घामासोबत शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते व आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे टाळण्यासाठी आपल्याला संपूर्ण आहार-विहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.


जेवणात पातळ पदार्थाचा समावेश करा ..! 


heat stroke care and summer food drink


१) जेवणामध्ये भरपूर पातळ पदार्थांचा समावेश करावा, जसे ताक, लिंबू पाणी, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, उसाचा रस, भाज्यांचे सूप घ्यावे.


२) गोड पदार्थ, कॉफी, चहा यांचा अति वापर टाळणे आवश्यक असून मांसाहाराचा अति वापर होऊच नये.


३) उन्हातून आल्यावर क्षारयुक्त पावडर टाकून पाणी पिणे, पातळ पदार्थाचे सेवन करावे, त्याशिवाय शिळे अन्न खाणे टाळावे, उष्ण वातावरणात अन्न लवकर खराब होते. ते खाल्ल्याने पोटाचे विकार उद्भवू शकतात.


हे पण बघा : Buttermilk Best Benefit : ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे....!


गोड आणि आंबट एकत्र नकोच


* जेवणात किंवा फळे खात असताना गोड व आंबट एकत्र यायलाच नको. सकाळी नाश्ता किंवा जेवण झालेले असेल तर दुपारचे जेवण टाळता आले तर योग्यच आहे.


* अशा वेळी ताक घेतले पाहिजे. सायंकाळचा चहादेखील बंद करावा, त्याने पित्त वाढते. सायंकाळी उसाचा रस, लिंबू सरबत घेतले तर शरीरात गारवा निर्माण होतो.

 > विडिओ नक्की बघा - 






हे पण नक्की वाचा..............




हा आहार घेऊन उष्मघाताचा धोका टाळा - heat stroke हा आहार घेऊन उष्मघाताचा धोका टाळा - heat stroke Reviewed by आयुर्वेदिक उपाय on May 19, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.