Buttermilk Best Benefit : ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे....!

गुणकारी ताक, अमृततुल्य ताक...!

 कुठल्याही, 'प्रकारचा शारिरीक, मानसिक त्रास झाला तर स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंचा प्रथमोपचार म्हणून उपयोग करून घेण्यासारखा आहे. काही अवघड वाटणाच्या त्रासासाठी सुद्धा घरात उपचार करता येण्यासारखा आहे.

Buttermilk Best Benefit : ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे....!
Buttermilk Best Benefit : ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे....! 

प्रत्येक स्वयंपाकघरांमध्ये असणाया महत्त्वाच्या वस्तू म्हणजे दूध, दही, ताक, तूप असतेच. त्यात ताकाचा विचार केला तर ताकाचा वापर हा जास्तच असतो. आरोग्यासाठी ताक औषधासारखे काम करते. जेवणात ताकाची केलेली कढी जेवणाची चव वाढवते.


आयुर्वेदिक उपाय या Whatsapp ग्रुपला Join होण्यासाठी यावर क्लिक करा ...


◾ताक तयार करण्याची पद्धती / Making Buttermilk :-


दुधावरची जाड साथ काढून तिला विरजण लावावे. विरजण लावल्यावर १० ते १२ तासांत दही लागते. अशा तऱ्हेने सायीला विरजण लावल्यावर लागलेले दही थंड जागी किंवा फ्रीजमध्ये तीन-चार दिवस साठवता येते व त्यात रोजची साय टाकता येते. अशा तऱ्हेने लावलेल्या दह्यात थंड पाणी घालून घुसळले की लोणी वेगळे होते. लोणी काढून घेतल्यावर उरते ते ताक. 

ताक तयार करण्याची पद्धती / Making Buttermilk
ताक तयार करण्याची पद्धती / Making Buttermilk

ताकात कुठल्याही प्रकारे स्निग्ध पदार्थ नसल्यामुळे ताकाचा गुणधर्म वेगळा व दह्याचा गुणधर्म वेगळा असतो. पाणी टाकून नुसते दही पातळ करून घेण्याचा उपयोग नसतो. योग्य प्रकारे ताक अमृततुल्य असते व ते प्यायल्यावर आपल्याला तृप्ती मिळते.


ताक फार घट्ट व पातळही नसावे. ताक वाटीत ठेवल्यावर थोड्या वेळाने वर पाणी व खाली पांढरट पदार्थ जमा झाला तर ताक फार पातळ आहे असे समजावे. आणि ताकात बोट बुडविल्यावर बोट पांढरे झाले तर ताक फार घट्ट आहे असे समजावे. अशा या ताकाचा आहारात समावेश असावा. म्हणजे जेवणाला परिपूर्णता लाभते. व जेवणाची तृप्ती होते.


◾ताकाचे आरोग्यदायी फायदे / Buttermilk Health Benefit :-

(१) शरीरातील कडकी कमी होण्यासाठी जेवणानंतर ताक अवश्य प्यावे.

ताकाचे आरोग्यदायी फायदे / Buttermilk Health Benefit


(२) जुलाब होत असल्यास साळीच्या लाह्या ताकाबरोबर खाता येतात.

ताक तयार करण्याची पद्धती / Making Buttermilk


(३)दही-पोहे आरोग्यासाठी उत्तम असतात.

Buttermilk Best Benefit : ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे....!


(४)भाजलेले जिरे, सैंधव मीठ व हिंग मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मूळव्याध,अतिसारामध्ये ताक उत्तम असते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते. 


(५) अपचन, म्हणजे जेवणाची वेळ होऊनही भूक न लागणे, पोटात जडपणा वाटणे यासारखी लक्षणे असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस व सैंधव मीठ टाकून वाटीभर ताक घोट घोट पिल्याने बरे वाटते.


(६) लघवी साफ होत नसल्यास पातळ ताक पिल्याने लगेच बरे वाटते. 


(७) दही-भात खाल्ल्याने शरीराची झीज भरून निघते. 

ताक तयार करण्याची पद्धती / Making Buttermilk


(८) आजारपणात तेलकट, मसालेदार पदार्थ वर्ज्य असतात. त्यावेळी ताक-भाकर खाता येते.


(९)उन्हाळ्यात थंड व मसालेदार ताक मनाला गारवा देत. 

ताकाचे आरोग्यदायी फायदे / Buttermilk Health Benefit


(१०) लंघन केले असता ताक पिल्याने फायदा होतो.


(११) शौचाला बांधून होण्यासाठी ताक उत्तम असते. म्हणून जुलाब होत असल्यास किंवा फार वेळा शौचाला जावे लागत असल्यास तुपाची फोडणी दिलेले ताक पिण्याचा उपयोग होतो. तुपात जिरे, कढीपत्ता, किसलेले आले यांची फोडणी करून, चवीप्रमाणे मीठ मिसळून चविष्ट ताक बनवता येते.


(१२) मूळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नेमाने वाटीभर ताक पिणे उत्तम होय. 


दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते 'ताक'.

                                                                                                आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!


हे पण नक्की वाचा..............

 Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..! 

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या ......... 


Buttermilk Best Benefit : ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे....! Buttermilk Best Benefit : ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे....! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 22, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.