vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!

आपल्या सभोवतालच्या गोष्टी आपल्याभोवती गोल फिरत आहेत, असे वाटून स्थिर उभे राहता न येणे व तोल जाणे याला 'चक्कर' असे म्हणतात. आयुर्वेदात चक्कर येणे या त्रासाला 'शिरोभ्रम' असे म्हणतात, चक्रावर बसून फिरण्याचा भास ज्या विकारात होतो त्याला शिरोभ्रम म्हणतात.

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!
vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!

Vertigo/Dizziness : 'चक्कर येणे' हे खरे तर केवळ एक लक्षण आहे. चक्कर आली म्हणजे मोठा रोग झाला आहे असे समजण्याची आवश्यकता नसते. चक्कर येत असल्यास प्रथम निदान करून घेणे आणि त्यामागचे कारण निश्चित करणे इष्ट होय. चक्कर कोणत्या कारणामुळे आली हे समजल्याशिवाय तिच्यावर उपचार करण्याचा फायदा होत नाही. चक्कर येण्याची विविध कारणे असतात. अशावेळी लगेच घाबरून जाऊन 'आपल्याला मेंदूचा कुठला विकार तर झालेला नाही ना' अशी शंका घेण्याची गरज नसते. मात्र वारंवार चक्कर आली तर तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. 

चक्कर येण्याची अनेक कारणे आहेत. बराच वेळ काही खाल्ले नसले किंवा भुकेकडे दुर्लक्ष झाल्यास चक्कर येऊ शकतात, मेंदूकडे रक्तपुरवठा नीट न झाल्यास, हृदय व मेंदू या महत्त्वाच्या अवयवांचे काम व्यवस्थित होत नसल्यासही चक्कर येऊ शकते. एखादे भयानक दृश्य पाहिल्यावर मळमळणे, चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो. वातदोष वाढण्याची अनेक कारणे असतात त्यामुळेही चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो. शरीराला खूप अशक्तपणा आल्याने, रक्त कमी असल्याने, हिमोग्लोबीन कमी झाल्यानेही चक्कर येतात. उन्हाची तिरीप लागली तरी चक्कर येऊ शकते. म्हणूनचं वरवर पाहता चक्कर साधी वाटली तरी उपेक्षा न करण्याजोगी चक्कर कशाकशामुळे येते व तिच्यावर काय उपचार आवश्यक आहे याची माहिती असायला हवी.

                                 आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 

Cause of Dizziness /Vertigo : चक्कर येण्याची कारणे -

 
Cause of Dizziness /Vertigo : चक्कर येण्याची कारणे
Cause of Dizziness /Vertigo : चक्कर येण्याची कारणे

आयुर्वेदात 'चक्कर येणे' याला शिरोभ्रम म्हटले जाते. भ्रम हा वातदोषाशी संबंधित असल्याने वातामुळे चक्कर येण्याची कारणे आपण पाहू:

■ अतिशय उंच स्वरात किंवा मोठ्याने बोलणे.

■ खूप वेळ बोलणे.

■ रात्री फार वेळ जागरण करणे

■ डोक्याला गार वारे लागणे.

■ अधिक प्रमाणात मैथुन करणे. 

■ त्रादी नैसर्गिक वेग अडवून ठेवणे.

■ सतत तसेच कडक उपवास करणे.

■ डोक्याला इजा पोचणे. 

■ खूप वेळ रडणे.

■ डोक्यावर जड ओझे उचलणे.

■ शोक, भय इत्यादी कारणांमुळे वाढलेला वात शिरोगत होऊन शिरोभागी राहणाऱ्या सिरा व धमनी मध्ये कुपित होऊन डोकेदुखी, शिरोकंप, शिरोभ्रम असे वातज शिरोरोग उत्पन्न करतो.

Cause of Dizziness /Vertigo : चक्कर येण्याची कारणे
Vertigo / Dizziness meaning

• वाताप्रमाणे पित्तदोष शरीरात असंतुलित झाला तरी त्यामुळे चक्कर येऊ शकते. पित्त वाढल्यामुळे डोके दुखत असले तर बरोबरीने बऱ्याचदा चक्करही जाणवते. अशा वेळी उलटी होऊन पित्त पडून गेले की चक्कर येणे थांबते, तसेच डोके दुखणेही कमी होते. 

                                                  आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 

• वातदोषाचे राहण्याचे मुख्य स्थान असते कान. वातदोष बिघडला की कानातही दोष उत्पन्न होणे स्वाभाविक असते. यातूनही Vertigo, चक्कर येणे वगैरे त्रास सुरू होतात, कानावर आघात झाला तर त्यामुळेही चक्कर येऊ शकते. 

• बऱ्याच स्त्रियांना गर्भारपणात सुरवातीच्या तीन महिन्यांत चक्कर येते, पण यामागे वाढलेले पित्त हेच मुख्य कारण असते. 

• शरीरात रक्त कमी असले, मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसला, रक्तदाब फार कमी किंवा फार जास्त असला, रक्तातील साखर एकाएकी कमी किंवा खूप वाढली तर त्यामुळेही चक्कर येऊ शकते. 

• स्त्रियांमध्ये स्त्री- असंतुलनाचे एक लक्षण म्हणूनही चक्कर येऊ शकते. मानसिक अस्वास्थ्य, नैराश्य, अतिमानसिक ताण यांच्यामुळेही चक्कर येऊ शकते. 

• चेतासंस्थेची कार्यक्षमता कमी झाली, विशेषतः प्रदीर्घ मधुमेहाचा परिणाम चेतासंस्थेवर झालेला असला तर चक्कर येऊ शकते. 

• मेंदूमध्ये गाठ असली तरी चक्कर येऊ शकते. 

• मणक्यांमधील अंतर कमी-जास्त झाल्याने तेथील नसांवर दाब आल्याने चक्कर येऊ शकते. 

• ताप एकाएकी खूप वाढला किंवा वात-पित्तज ताप असला तर चक्कर येऊ शकते. 

• अंमली पदार्थांचे सेवन केल्याने किंवा ड्रग्जच्या आहारी गेल्याने चक्कर येऊ शकते. 

• काही तीव्र औषधांचा दुष्परिणाम म्हणूनही चक्कर येऊ शकते.


चक्कर कोणत्या कारणामुळे आली हे समजल्याशिवाय तिच्यावर उपचार करण्याचा फायदा होत नाही. विशेषतः ज्येष्ठ वयाच्या व्यक्तींना किंवा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, अर्धांगवात वगैरे प्रदीर्घ विकारांचा इतिहास असणाऱ्यांना चक्कर आली तर लागलीच विशेष तपासण्यांचा आधार घेणे आवश्यक असते.

                                                  आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 

◾घरगुती उपचार : Home Remedies 


साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात.


◾पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते.

घरगुती उपचार : Home Remedies vertigo
घरगुती उपचार : Home Remedies vertigo

◾रक्तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे होतो. चाटून खाण्याचा उपयोग

घरगुती उपचार : Home Remedies vertigo
घरगुती उपचार : Home Remedies vertigo

◾मानसिक क्षोभामुळे, अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस चार चमचे व चमचाभर खडीसाखर असे मिश्रण घेता येते.

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!

◾ऊन लागल्यामुळे चक्कर येत असली तर नाकात दुर्वांच्या रसाचे २-३ थेंब टाकण्याचे तसेच टाळूवर आवळकाठीच्या चूर्णात पाणी मिसळून तयार केलेला लेप लावून ठेवण्याने बरे वाटते.

◾फार अशक्तपणा जाणवत असला व चक्कर येत असली, बरोबरीने तोंडाला चव नसली तर मनुका खाण्याचा उपयोग होतो. मनुका थोडेसे सैंधव लावून थोड्याशा तुपावर परतून घेतल्या व काही दिवस रोज खाल्ल्या तर गुण येतो.

घरगुती उपचार : Home Remedies vertigo

◾कोणत्याही कारणाने शुक्रक्षय झाला असला (हस्तमैथुन, अतिमैथुन, स्वप्नदोष वगैरेमुळे) व त्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर येत असली तर रोज अर्ध्या नारळाचे ओले खोबरे वाटून त्यातून निघालेले दूध चवीनुसार साखर टाकून पिण्याचा उपयोग होतो.

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!

◾ताप चढल्यामुळे चक्कर येत असली तर कपाळावर रिठ्याच्या पाण्याच्या घड्या ठेवण्याने बरे वाटते. यामुळे ताप उतरण्यासही मदत मिळते. बरोबरीने तापावर योग्य उपचार करणे आवश्यक होय.

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!

◾डोक्यात सर्दी साठून म्हणजे डोके जड होऊन चक्कर येत असली तर सुंठीचे बारीक चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्याने बरे वाटते.

◾रक्तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली असता पटकन साखर-पाणी देण्याचा उपयोग होतो.

Vertigo / Dizziness Causes : चक्कर येण्याची कारणे

◾भूक लागली असूनही बराच वेळ काही खाणे झाले नाही तरी चक्कर येऊ शकते. असा वेळी साळीच्या लाह्या, दूध, साखर असे मिश्रण खाण्याने लगेच बरे वाटते.

◾गाडी लागल्यामुळे चक्कर येण्याची सवय असणाऱ्यांना प्रवासाच्या आधी व प्रवासात थोड्या थोड्या वेळाने साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग होताना दिसतो.

घरगुती उपचार : Home Remedies vertigo
घरगुती उपचार : Home Remedies vertigo

◾विरळ हवेच्या उंच ठिकाणी जाताना सुती कापडात कापूर, वेलची, ओवा, वेखंड यांच्या पुरचुंडीचा अधूनमधून वास घेण्याने चक्कर येण्यास प्रतिबंध होऊ शकतो.


अशा प्रकारे चक्करेवर साधे उपचार करता येतात, बहुतेक वेळा त्यांचा उत्तम गुण येतो, मात्र वारंवार चक्कर येत असली, त्याबरोबर इतर गंभीर लक्षणे दिसत असली, व्यक्तीचे वय मोठे असले किंवा घरात गंभीर विकारांचा इतिहास असला तर मात्र लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणेच श्रेयस्कर होय.

                                                         आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 

◾हे करा !

🔸 चक्कर आल्यास घरातल्या घरात ताबडतोब करायचा उपाय म्हणजे लिंबाचा रस दोन चमचे, अर्धा चमचा आल्याचा रस व एक चमचा मध एकत्र करून चाटवणे किंवा प्यायला देणे.

🔸 चक्कर आली तर गूळ खाऊन पाणी प्यावे, जवळ काही खाण्याची वस्तू असेल तर ती खावी.

🔸 सुगंधी वातावरणात बसावे. 

🔸 टाळूला तेल चोळावे व संपूर्ण डोक्याला मालिश करावे.

🔸 पायाच्या पोटऱ्या स्वतः दाबाव्यात किंवा दुसऱ्याकडून दाबून घ्याव्यात.


                                                        आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 


हे पण नक्की वाचा..............


 Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !

 नोकरदारांचा आहार कसा असावा...?


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या .........


IPL च्या बातम्यासाठी व UPDATE साठी या लिंकवर क्लिक करा !


vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...! vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 17, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.