योगासने आणि व्यायाम यातील फरक व योगासने आणि त्याचे फायदे

योगासनं आणि व्यायाम... 


Yogasane - बऱ्याचदा व्यायाम आणि योगासनं एकच, असा गैरसमज दिसून येतो. मात्र योगासनं आणि व्यायाम यांमध्ये बराच फरक आहे. काय आहेत हे फरक? काय आहेत योगासनं आणि काय त्याचे फायदे? चला पाहू यात...  


योगासने आणि व्यायाम यातील फरक व योगासने आणि त्याचे फायदे



संस्कृत 'युज्' धातूपासून उत्पन्न झालेल्या 'योग' या शब्दाचा अर्थ 'एकत्र येणे' असा आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा परम तत्त्वाशी संयोग साधण्याची कला म्हणजे योग. योगाभ्यासाच्या साह्याने व्यक्तीला जीवात्मा आणि परम तत्त्व यांची एकात्मता साधून व्यक्तिगत पातळीवर मुक्तता, समाधान आणि सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेता येतो, असे योगदर्शन सांगते.


योगासनं आणि व्यायाम यांचे वेगवेगळे प्रकार आहेत.


🔸 आसनांचं स्थितीनुसार वर्गीकरण : 


योगासने आणि व्यायाम यातील फरक व योगासने आणि त्याचे फायदे

१. उभं राहून : ताडासन, त्रिकोणासन, कटिचक्रासन...


२. बसून : पद्मासन, सिद्धासन, वज्रासन, गोमुखासन....


३. पाठीवर पडून : पवनमुक्तासन, हलासन शवासन...


४. पोटावर पडून : भुजंगासन, शलभासन, धनुरासन, मकरासन...


५. अधोमुख (खाली डोके व वर पाय अशी अवस्था) : शीर्षासन, वृश्चिकासन.....



हे पण बघा - पित्ताचा त्रास होतोय ? मग नक्की करा हे घरगुती उपाय....


🔸 इतर व्यायामांचे प्रकार :



yoga, yogasane


• ॲरोबिक्स, जिमिंग, पीटी, बिस्क किंवा फास्ट वॉकिंग


• खेळ : बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी...


•लिबरस वर्क : शारीरिक कष्टांची कामे •स्विमिंग



योगा आणि व्यायामामधील फरक :  


योगा आणि व्यायामामधील फरक


• योगासनांमध्ये फिजिकल स्टॅबिलिटी आणि मानसिक प्रसन्नतेचा विचार होतो.


• ब्लड सर्क्युलेशन डेव्हलपमेंट, फॅट्स कमी करणे, हाडांना बळकटी, मेंदूचा विकास आणि प्रजनन संस्थेचं रेग्युलरायझेशन यांमध्ये उपयोगी पडणारं योगा स्ट्रेस रिलिझरही आहे. व्यायामामध्ये मसल डेव्हलपमेंट आणि फॅट्स कमी करण्यावर भर.


• योगामध्ये श्वासोच्छ्वास करण्याची विशिष्ट पद्धत असल्यानं ते सावकाश, दीर्घ करता येतं. व्यायाम करताना रेग्युलर , श्वासोच्छ्वासामुळे श्वसनसंस्थेवर ताण पडतो आणि रक्तसंचरणाचा व श्वासाचा वेग वाढतो.


• आसनस्थितींमुळे शरीरातील पोकळ अवयवांना अधिक ब्लड सर्क्युलेशन होतं. त्यामुळे शरीराच्या क्रिया व्यवस्थित होतात. व्यायामामध्ये हातापायातील घटकांना राबवल जातं.


• पद्मासनांसारख्या आसनांमध्ये हात-पाय दाबले जातात आणि ब्लड सर्क्युलेशन होतं. त्यामुळे हृदयपेशींवर ताण न पडता रक्ताभिसरण लयबद्ध होतं. व्यायाम करतांना ठराविक भागावर अधिक लक्ष केंद्रित केल्यानं त्याच भागाकडे ब्लड सर्क्युलेशन होतं.


• योगासनं आणि प्राणायाम चेतनसंस्थेतील विश्राम संस्थेशी निगडित कार्य करतं. ही संस्था हृदय, फुफ्फुसं, आतडी, मूत्र आणि जननसंस्थेशी निगडित असते. त्यामुळे शरीर शांत व स्थिर होतं. व्यायामामध्ये शरीरातील चेतना संस्थेच्या सावधान शाखेनं जास्त काम केल्यानं हृदयक्रिया, रक्तदाब, श्वसन, तापमान, घाम आदींमध्ये वाढ होते.



योगासने कधी व कुठे ?  

भारत सरकारच्या पुढाकाराने २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. शारीरिक आरोग्य, मानसिक शांती, सामाजिक स्थिरता इतकेच नाही तर निसर्गातील समतोल कायम राहावा, सुधारावा यासाठी 'योग' व 'योगासने' यांच्याशिवाय पर्याय नाही हे सर्वांच्याच लक्षात येऊ लागले आहे.  


योगासने कधी व कुठे ?



'योगासन' ही योगासनातील महत्त्वाची आणि रोज सराव करण्याजोगी पायरी होय. इतर कोणत्याही सरावाप्रमाणे योगासनांमध्ये नियमितता राखणे गरजेचे असते. धरसोड करत योगासने केली, तर त्यातून अपेक्षित परिणाम दिसायला विलंब लागू शकतो. योगासने कधी व कुठे करावीत याबद्दल अनेक प्रश्न असतात. यासंदर्भात पुढील मुद्दे मांडता येतील,

• शुद्ध व शांत वातावरणात योगासने करणे सर्वोत्तम असते. कमीत कमी कोलाहल, वर्दळ नसणाऱ्या ठिकाणी शांत मनाने योगासने करणे चांगले.

• योगासने करण्यासाठी आसन असावे व ते स्वच्छ, सुती, रेशमी, लोकर किंवा गवताच्या चटईचे असावे.

• योगासने करायच्या ठिकाणी अडगळ, कचरा किंवा तत्सम अशुद्धी नसावी.

• योगासने करण्यासाठी पोट रिकामे किंवा हलके असावे. लिंबू-पाणी, मध-पाणी किंवा कपभर लाइट चहा घेऊनही योगासने करता येतात.

• योगासने करण्यापूर्वी मल-मूत्र विसर्जन झालेले असावे.

• योगासने करताना कपडे सैलसर, शक्यतो सुती कापडापासून बनविलेले असावेत. 

• घाईघाईने किंवा मन तणावग्रस्त असताना योगासने करणे टाळणेच चांगले. नियमित योगाभ्यास केला आणि आयुर्वेदिक जीवनशैली स्वीकारली, तर मुळात रोग होणारच नाहीत; मात्र कोणताही रोग असला, शरीरात वेदना असल्या, कमालीचा थकवा जाणवत असला तर वैद्यांचा किंवा योगप्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक होय.

• गरोदरपणात विशेष योगासने करण्याचा अप्रतिम फायदा होताना दिसतो. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे चांगले.

• योगासनांची सुरवात प्रार्थनेने करणे आणि शेवट शवासन किंवा ध्यानाने करणे उत्तम असते.

• योगासने करताना श्वासावर लक्ष ठेवणे आणि श्वासाची गती वाढणार नाही, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. श्वास नाकावाटेच घेतला पाहिजे. श्वासाच्या माध्यमातून प्राणशक्ती शरीरात प्रवेशित होत आहे आणि प्रत्येक पेशीला पुनर्जीवित करते आहे, ही भावना मनात ठेवण्याने योगासनाचे फायदे वृद्धिंगत होतात असा अनुभव आहे.


शरीरात जडपणा जाणवत असला किंवा जखडल्यासारखी जाणीव होत असली, तर सुरवातीला साधे 'स्ट्रेच'सारखे म्हणजे मान पुढे वाकवणे, मागे वाकवणे, उजव्या डाव्या बाजूला वाकवणे, मान वळवून उजव्या डाव्या बाजूला पाहणे, मान चक्राकार पद्धतीने गोलाकार फिरवणे, हात सरळ दिशेत वर-खाली घेणे, शरीराशी काटकोनात वर खाली करणे, हाताचे पंजे खांद्यांवर ठेवून खांदे समोरच्या आणि मागच्या बाजूने गोलाकार दिशेत फिरवणे यासारख्या क्रिया करता येतात.
  


आसनांचा सराव :


योगासनांमध्ये सहजतेने करता येण्याजोगी आसने म्हणजे ताडासन, वृक्षासन, शवासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, आराम वगैरे.  
योगासने आणि त्याचे फायदे



थोडा सराव झाला, की करता येण्याजोगी आसने म्हणजे पादहस्तासन, पश्चिमोत्तानासन, अर्धचक्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, सूर्यनमस्कार वगैरे सर्व योगासने.


नियमित योगासनांमुळे शरीर छान लवचिक झाले, की नंतर करावीत अशी आसने म्हणजे हलासन, त्रिकोणासन, सेतुबंधासन, शलभासन, धनुरासन, उग्रासन, वक्रासन वगैरे. अर्थात याहीपेक्षा अधिक अवघड आसने असतात; मात्र अवघड आसने करण्यापेक्षा प्रकृतीला आणि वयाला साजेशी आसने नियमित करण्याचा अधिक चांगला उपयोग होतो असे दिसते.


प्राणायामापैकी अनुलोम-विलोम सहजतेने करता येऊ शकतो.





जास्त विचारले जाणारे प्रश्न....


१) शारीरिक व्यायाम आणि योग आसनांमध्ये काय फरक आहे ?
२) व्यायामापेक्षा योग्य अधिक प्रभावी आहे का ?
३) योग आणि व्यायाम यातील दोन फरक काय आहे ?
४)  किती वेळा योग करावा ?
५) योगाचे प्रकार कोणते आहे ?

या सर्वांची उत्तरे वर देण्यात आलेली आहे. तरी लेख लक्ष देऊन वाचा ,त्याचबरोबर तुम्हाला अनेक प्रश्नांनची उत्तरे वर मिळतील. 






हे पण नक्की वाचा..............

 Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..! 

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!  

आरोग्यदायी खजूर : खजूर खाण्याचे गुणकारी फायदे....


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या ......... 


योगासने आणि व्यायाम यातील फरक व योगासने आणि त्याचे फायदे योगासने आणि व्यायाम यातील फरक व योगासने आणि त्याचे फायदे Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 30, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.