पित्ताचा त्रास होतोय ? मग नक्की करा हे घरगुती उपाय....


Pitta/ Bile :- अन्नपचन व त्यामधून तयार झालेल्या आहाररसापासून सप्तधातूंची निर्मिती करण्याचे काम संतुलित पित्त करत असते. तसेच शरीराच्या उष्णतेचे नियमन करणे, त्वचेला मृदुता व तेजस्विता देणे, स्फुर्ती, उत्साही वृत्ती, शूरता अशा अनेक गोष्टी पित्तामुळे होत असतात. शरीरात असलेल्या अग्नीमुळे भुक लागते व त्यामुळे खाल्ले जाते. पुढे हाच अग्नी अन्न पचवतो. पित्त हा अग्नीचा प्रभाव असतो आणि अग्नी वाढला की शरीरातील पित्त वाढते. शरीरातील हार्मोनल संस्था जर बरोबर नसेल तर खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. म्हणजे पित्त असंतुलित होते.


पित्ताचा त्रास होतोय ? मग नक्की करा हे घरगुती उपाय..
पित्ताचा त्रास होतोय ? मग नक्की करा हे घरगुती उपाय..


प्रकुपित पित्ताला जेव्हा कफ किंवा वाताची जोड मिळते व ते त्वचेवर किंवा आत रक्तधातूमध्ये पसरते तेव्हा pitta in body अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. पित्ताला वाताची जोड असते तेव्हा त्याला 'शीतपित्त' म्हणतात, तर जेव्हा पित्ताला कफाची जोड मिळते तेव्हा त्याला 'उदर्द' म्हणतात. तेव्हा जोड वाताची किंवा कफाची असली तरी पित्ताचा मुख्य सहभाग असल्याने सामान्य भाषेत याला पित्त उठणे असे म्हटले जाते.

अग्नी वाढला तर शरीरात पित्त वाढते. जसे आग पसरविण्याचे काम वारा करतो. तसेच शरीरात पित्त वाढविण्याचे काम वारा (वात) करतो. अति वात स्वभाव असणाऱ्यांचे पित्त वाढू शकते. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात पाणी प्यायले नाही, शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न झाला नाही तरी पित्त वाढते. वारंवार तिखट, तीक्ष्ण मसाले खाण्यानेही त्रास होतो. मिट्टी पिकत वाढवायला मदत करते. तर मसाल्याचे पदार्थ अग्नी वाढविणारे असतात त्यामुळे पोटात आग पडते व पित्ताचा त्रास सुरू होतो.

  
हे पण बघा -   ऍसिडिटीपासून मिळवा कायमची मुक्तता...!! 

अंगावर पित्त उठणे ही कशाची तरी ॲलर्जी आहे असेही बऱ्याच वेळा समजले जाते. काही प्रमाणात हे खरे असले तरी धूळ, धूर, सूर्यप्रकाश यांच्यापासून अगदी शंभर टक्के दूर राहणे केवळ अशक्य होय किंवा प्रत्येक वेळी अँटिॲलर्जिक गोळी घेऊन रोग दबवत राहण्याची सवय लावून घेणेही अयोग्य आहे.त्यामुळे आहाराचे योग्य नियोजन करणे, बरोबरीने रोगप्रतिकारक्षमता सुधारणे आणि पित्तशामक, रक्तशुद्धीकरण उपचार करणे ही त्रिसूत्री या रोगात सांभाळणे महत्त्वाचे असते.

                                                                                    आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!

◾पित्ताचा प्रकोप केव्हा ?

पित्ताचा त्रास होतोय ? मग नक्की करा हे घरगुती उपाय..


शरद ऋतूत म्हणजे जेव्हा स्वाभाविकपणे Pitta dosha पित्तदोषाचा प्रकोप होत असतो, तेव्हा अंगावर पित्त उठण्याची जास्ती शक्यता असते. शरदानंतर येणाऱ्या थंडीतही हवेत थंडता वाढल्याने त्रास होऊ शकतो. याशिवाय वमन अयोग्य किंवा अपुऱ्या प्रमाणात झाल्याने किंवा उलटीचा वेग जबरदस्तीने अडवून ठेवण्यानेही पित्ताच्या गांधी उठू शकतात. अपचनाने किंवा पोटात जंत झाल्यानेसुद्धा पित्ताच्या गांधी उठण्याचा त्रास होऊ शकतो. याची अजून एक विशेषता अशी की, एकदा का या रोगाची प्रवृत्ती बळावली की सबळ कारणाशिवायही पित्ताच्या गांधी उठतात. रोगाची सुरवात झाल्यावर त्यावर लगेच योग्य उपचार झाले नाहीत आणि केवळ लक्षणे दबवण्याचे उपचार घेतले तर हळूहळू रोगाची तीव्रता वाढत जाते.


◾पित्त उठते तेव्हा....

पित्त उठते तेव्हा नेमकी कोणती लक्षणे दिसतात, हे प्रथम समजून घेऊ :- 


शरीरावर पित्त उठते तेव्हा.../ pitta in body


•शरीराच्या अमुक भागावर किंवा क्वचित संपूर्ण शरीरावर गांधीलमाशी किंवा मच्छर चावल्याप्रामणे ददोडे येतात.

• गांधी आलेल्या ठिकाणी दाह तर असतोच, बरोबरीने खाज वा वेदनाही असू शकतात.

•त्या ठिकाणची त्वचा अतिशय संवेदनशील होते, कंड सुटला की खाजवायची इच्छा होते, पण नखाचा स्पर्श सहन होत नाही.

•गांधी एकाएकी येतात तशाच हळूहळू नाहीशा होतात.

• अकारण एखाद्या ठिकाणी सूज येते, ती जागा हुळहुळते व मग हळूहळू पूर्ववत होते.

• फार तीव्र असंतुलन असले तर गांधी काही दिवसही राहू शकतात.

सूर्याचे प्रतिनिधित्व करणारे पित्त हे तेजतत्त्व आपल्या उष्णता, तीक्ष्णता, आंबटपणा इत्यादी गुणांनी जेव्हा असंतुलित होते तेव्हा अनेक लक्षणे निर्माण करते.


                                                                                  आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!

🔸 पित्तवृद्धीची लक्षणे :-


पित्तवृद्धीची लक्षणे / pitta symptoms


• संपूर्ण शरीराची किंवा हातापायाचे तळवे, डोळे अशा स्वतंत्र अवयवांची आग होते.

• डोळे, नखे, त्वचा, मूत्र, मल इत्यादींचा स्वाभाविक रंग बदलून त्यांना पिवळा, लाल किंवा किंचित हिरवा रंग येतो.

• शरीराचे तापमान वाढते किंवा आतून गरम वाटते.

• गळवे, फोड वगैरे येतात व त्यात पाणी, पू तयार होतो.

• जखम झाल्यास ती स्वभावतः न भरता पिकते.

• शरीरातील एखादा भाग कुजायला सुरवात होते, उदा. गँग्रीन. तोंडाची चव आंबट वा कडू होते.

• शरीरातील मांस मेदादि धातु सैल होतात.

• चक्कर येते.

•थंड गोष्टींचा स्पर्श व सेवन हवेहवेसे वाटते.

• झोप कमी होते.

• डोळ्यासमोर अंधारी येते.



🔸 पित्तक्षयाची लक्षणे :- 


पित्तवृद्धीची लक्षणे / Bile / pitta symptoms


यात पित्ताची प्राकृत कार्ये ठीक होऊ न शकल्याने खालील गोष्टी घडू शकतात.

• शरीर थंड पडते, अकारण थंडी वाजते.

• निस्तेजता येते. त्वचा, डोळे, केस यांच्यावरची चकाकी लुप्त होते.

• पचन मंदावते.



🔸 पित्तदोषाच्या असंतुलनामुळे होणारे काही रोग असे असतात की त्यांना कारणीभूत केवळ पित्तच असते. अशा रोगांना 'पित्ताचे नानात्मज रोग' असे म्हटले जाते.

पित्ताचे नानात्मज रोग :-

•कावीळ

• रक्तपित्त (नाक, कान वगैरेतून रक्तस्राव होणे)

• अम्लोद्गार (घशाशी आंबट येणे).

• विदाह (घसा, छाती, पोटात जळजळ होणे), यालाच आपण सामान्यतः ॲसिडीटी म्हणतो.

• दवथु (हृदय धडधडणे)

• मुखपाक (तोंड येणे इत्यादी)

                                                                                 आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!

🔸 पित्तावर रामबाण उपाय :- 


पित्तावर रामबाण उपाय / pitta remedies



🔸 पित्ताचे संतुलन करण्यासाठी सर्वश्रेष्ठ औषध म्हणजे दूध, तूप तर सर्वश्रेष्ठ उपचार म्हणजे विरेचन होय. तसेच पृथ्वी, आप, वायु या महाभूतांचे आधिक्य असणाऱ्या द्रव्यांच्या उपयोगाने पित्तदोष शांत होतो.


🔸 पित्त संशमन द्रव्ये - रोजच्या वापरातील दूध, लोणी, तूप, खडीसाखर, साळीच्या लाह्या, केळे, खारीक, नारळ, ऊस, शिंगाडा हे पदार्थ पित्त कमी करतात.


🔸 वनस्पतींपैकी चंदन, वाळा, ज्येष्ठमध, दूर्वा, आवळा, अनंतमूळ, उंबर, शतावरी, गुलाब फूल, कमळाचे फूल इत्यादी पित्तशमन करण्यात श्रेष्ठ आहेत. मोती, प्रवाळ यांच्यापासून आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेली पिष्टी किंवा भस्मे पित्तशमन करणारी असतात.


◾घरच्या घरी उपाय :-


या त्रासावर दाह, कंड, वेदना कमी करणारे उपाय करणे जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच वाढलेला पित्तदोष, दूषित झालेले रक्त पुन्हा संतुलित करणेही आवश्यक असते. घरच्या घरी करता येण्याजोगे काही अनुभवी उपाय याप्रमाणे सांगता येतील... 


पित्तावर घरगुती आयुर्वेदिक उपाय / home remedies for pitta


• आमसूल पाण्यात भिजत घालून कोळून घेतले व त्याचे गाळलेले पाणी पित्त उठलेल्या ठिकाणी लावले तर बरे वाटते.   

• दाह खूप होत असताना कोरफडीचा ताजा रस लावण्याने, गुलाबपाणी किंवा शतधौतघृत लावण्यानेही बरे वाटते.

• टाकळ्याच्या बिया, हळद, तीळ यांचे चूर्ण ताकात मिसळून उटण्याप्रमाणे लावण्यानेही खाज, वेदना कमी होण्यास मदत मिळते.

• गेरू थोड्या तुपावर परतून घेऊन त्याची बारीक पूड दह्यात मिसळून पित्त उठलेल्या ठिकाणी लावून ठेवली तर दाह, कंड, कमी होण्यास मदत मिळते.

•ज्येष्ठमध उगाळून तयार केलेल्या लेपात थोडेसे तूप मिसळून ते मिश्रण पित्त उठलेल्या ठिकाणी लावण्याने लगेच बरे वाटते.

• कडुलिंबाच्या पानांचे चूर्ण व आवळ्याचे चूर्ण एकत्र करून तुपात मिसळून घेतल्यास शीतपित्त, उदर्द, कंड यांचे शमन होते.

• गुळवेल, धमासा, कडुलिंबाची साल व हळद यातील मिळतील तेवढ्या वनस्पतींचा काढा करून घेणे शीतपित्तामध्ये उपयुक्त असतात.

• अनंतमूळ, मंजिष्ठा, रक्तचंदन, ज्येष्ठमध यासारख्या पित्तशामक व रक्तदोषनाशक वनस्पती शीतपित्तामध्ये उपयोगी असते.

• दर १५-२० दिवसांनी एरंडेल तेल घेऊन पोट साफ करून घेणे, नियमित पादाभ्यंग करणे हेसुद्धा प्रभावी उपाय होत.

आहाराचा विचार करता, पित्त वाढविणारे पदार्थ, रक्तात दोष निर्माण करणारे पदार्थ टाळणे आवश्यक असते. या दृष्टीने आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, पचण्यास जड पदार्थ, ढोबळी मिरची, वांगे, गवार, कोबी, फ्लॉवर, अननस, दही, अंडी, मांसाहार, कच्चा टोमॅटो यासारख्या गोष्टी अपथ्यकर असतात.

आचरणामध्ये काळजी म्हणजे वेळेवर जेवणे, रात्री जागरण न करणे, भुकेकडे दुर्लक्ष न करणे, तीव्र उन्हात न जाणे याकडे लक्ष ठेवणेही आवश्यक असते.

                                                            आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!


◾पित्तज विकार पित्तप्रकृती असणाऱ्या व्यक्तींना सहज होऊ शकतात. पित्तप्रकोपाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे असतात:-  


pitta dosha treatment

• तेलकट तसेच चवीला आंबट, खारट व तिखट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे, उदा. चिंच, दही, टोमॅटो, इडली, डोसा, ढोकळा इत्यादि आंबवलेले पदार्थ; अननस, कच्ची कैरी, आंबट संत्रे वगैरे फळे; तसेच चिवडा, भेळ-पुरी, पाणी-पुरी, सामोसा वगैरे.

• वीर्याने उष्ण, तीक्ष्ण असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे. उदा. मिरची, मिरी, हिंग इत्यादी.

• तीळ तेल, मोहरी, कुळीथ, पुदिना, मिरची, लसूण वगैरे चटणीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचे सेवन अतिप्रमाणात करणे.

• दही, कांजी, मद्य, आंबट ताक, यांचे नियमित सेवन करणे.

• मासे, बकरी वगैरे मांसाहार करणे. आंबट फळांचे अतिप्रमाणात व तेही उपाशी पोटी सेवन करणे.

• शरीरशक्तीपेक्षा अधिक काम करणे. • अत्याधिक मैथुनासक्त असणे.

• रात्री जागरण करणे, तसेच दिवसा झोपणे.

• सतत प्रवास करणे.

पित्त उठल्यावर प्रत्येक वेळी अँटिॲलर्जिक गोळी घेऊन रोग दबवत राहण्याची सवय लावून घेणे अयोग्य आहे. आहाराचे योग्य नियोजन करणे, बरोबरीने रोगप्रतिकारक्षमता सुधारणे आणि पित्तशामक, रक्तशुद्धीकर उपचार करणे ही त्रिसूत्री सांभाळणे महत्त्वाचे असते.




जास्त विचारले जाणारे प्रश्न....

१) पित्तापासून कायमची सुटका कशी मिळवावी? 
२) पित्तात काय खावे?
३) पित्ताचे घरगुती उपाय कोणते?
४) पित्तावर रामबाण उपाय कोणता?




हे पण नक्की वाचा..............

 Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..! 

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!  

आरोग्यदायी खजूर : खजूर खाण्याचे गुणकारी फायदे....


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या ......... 

 

पित्ताचा त्रास होतोय ? मग नक्की करा हे घरगुती उपाय.... पित्ताचा त्रास होतोय ? मग नक्की करा हे घरगुती उपाय.... Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 27, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.