आरोग्यदायी खजूर : खजूर खाण्याचे गुणकारी फायदे....


Dates/Khajoor : सुकामेवा म्हटला की डोळ्यासमोर काजू बदाम, खारीक,मनुका या वस्तू उभ्या राहतात. या वस्तू महाग असल्या तरी आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशाच आहेत. त्यातील खारीक अथवा खजूर विषयी जाणले असता त्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे अमर्याद आहेत. आहार हा जीवनाचा मुख्य आधार असतो. नुसते पोट भरणे हा आहाराचा अर्थ नसून शरीराला व मनाला समाधान देण्याचे सामर्थ्य ज्यात असते तोच खरा आहार होय.

सुकामेवा हा प्रकृतीला अनुकुल असतो. तरी हिवाळ्यामध्ये सुकामेवा निश्चित खायचा असतो. त्यातलाच एक खजूर सर्वांना परिचयाचा आहे.प्राचीन काळापासून आपल्या देशात खजुराचा उपयोग केला जातो. भारतात थोड्याफार प्रमाणात खजूर उत्पन्न होतो. प्रामुख्याने अरब देशांतून खजूर आपल्याकडे येतो.पिकलेल्या फळांना खजूर म्हणतात आणि अर्धवट पिकलेल्या सुक्या फळांना खारीक म्हणतात. आपल्याकडे उत्तम प्रतीच्या खारका इराण व अरबस्तानातून येतात. प्रामुख्याने उष्ण हवामानामध्ये खजूर होतो.

साधारणत: खजूर आपल्याकडे फक्त उपवासाच्या दिवशी खातात. कारण त्या दिवशी चौरस अन्न खाल्ले जात नाही. अशावेळी भूळ धरून ठेवण्यासाठी तसेच रक्तवाढीसाठी खजूराचा उपयोग होतो. खजूर थोडासा उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे तो तूप घालुन खावा. कोणताही खजूर वाळविल्यानंतर खारीक होते, असा बऱ्याच जणांचा समज होतो. पण खारीक बनविण्यासाठी विशेष प्रजातीचा खजूर आवश्यक असतो.

खारकेचे दोन प्रकार असतात. एक पांढरी छोटी खारीक, जी खुसखुशीत असते. दुसरी गर्द तपकीरी खारीक, ज्यात तंतू अधिक प्रमाणात असतात व त्यामुळे ती चिवट असते, कुटायलाही अवघड असते.

खारीक सर्वासाठी अत्यंत उपयुक्त असते.

                                                                                         आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!

◾ खारकेचे औषधी गुणधर्म:-


खजूर/खारकेचे औषधी गुणधर्म
खजूर/खारकेचे औषधी गुणधर्म


• खारीक रसाने मधुर व तुरट असते.

• गुणाने लघु म्हणजे पचण्यास हलकी असते.

• शीत-वीर्याची असून, वात-पित्तशामक असते.

• खारीक शुक्रधातूसाठी पोषक असते.

• मुर्छा व मद्यपानाने उत्पन्न होणारे रोग, दाह, क्षय यांचा नाश करते.

• खारीक दुधात उकळल्यामुळे पचायला हलकी होते. डिंकाच्या लाडूत किंवा बाळंतिणीच्या खाण्यातच केवळ खारीक वापरावी असे नव्हे तर सर्वासाठीच खारिक अत्यंत उपयोगाची आहे. यादृष्टीने खारीक, बदाम, काजु, खडीसाखर, मनुका एकत्र करून केलेले पंचखाद्य प्रसाद म्हणून वापरले तर स्वयंपाकघरात असलेल्या खारकेचा आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो.

• खारीक ही नवजात बालकापासून घरातील ज्येष्ठ व्यक्तीसाठी उत्तम वरदान असणारी अशी आहे. अगदी तान्ह्या बाळाला गुटीबरोबर खारीक उगाळून दिली जाते, तर मोठ्या माणसांनी खारकेची पूड करून खाणे चांगले असते, खारीक चावून खायची असली तर अगदी बारीक चावून खाणे आवश्यक असते.

• खजूर थोडा ओला व मऊ असतो तर खारीक सुकलेली व कडक असते. खजूर व खारीक यातील फरक म्हणजे खजूर किंचित उष्ण व पचायला खारकेपेक्षा जड असतो. खारिक थंड व पचायला हलकी असते. खजूर खातांना आतली बी काढून त्यात चमचाभर तूप टाकून खावा. चांगल्या प्रतीची खारीक आणून चूर्ण करून ठेवावे. चमचाभर खारकेचे चूर्ण रोज सकाळ-संध्याकाळ घेण्याने हाडे मजबूत राहायला मदत मिळते.

                                                                                         आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!

◾खारीक खाण्याचे फायदे : Khajur Fayde 


• खारकेचे चमचाभर चूर्ण तुपासह सकाळ-संध्याकाळ घेण्याने स्त्रियांमध्ये पाळी साफ होते.
• ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी व्यवस्थित रक्तस्त्राव होत नाही तसेच पोट दुखते त्यांच्यासाठी खारीक हे एक उत्तम औषध आहे. चांगल्या प्रतीच्या खारकेचे चमचाभर चूर्ण व तूप यांचे मिश्रण रोज घेण्याने फायदा होतो.

Dates/Khajoor


• अंगात ताप मुरतो, उष्णता वाढते अशावेळी दूधात खारिक, मनुका, सुंठ उकळून साखर व तुपासह देतात.
खजूर/खारीक खाण्याचे फायदे


• वजन वाढण्यासाठी रोज सकाळी दोन खजूर तुपासह घेण्याने उपयोग होतो.

आरोग्यदायी खजूर : खजूर खाण्याचे गुणकारी फायदे....



• रात्री खजूर पाण्यात भिजत घालून सकाळी कुस्करून पाणी प्यायल्यास पोट साफ होते.

khajur/khajoor khanyache fayde

• अशक्तपणा घालविण्यासाठी किंवा वजन वाढविण्यासाठी खजूर दुधात उकळवून देतात.    

आरोग्यदायी खजूर : खजूर खाण्याचे गुणकारी फायदे....


• शरीरात दाह होत असल्यास, व्यक्ती कृश असल्यास खजूर तुपात तळून खायला देतात. अत्यंत पौष्टिक असून वजन वाढविण्यास उपयुक्त ठरतो.

         आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!


• खजूर कफ निःसारक असल्यामुळे क्षयाच्या रुग्णांमध्ये वजन वाढविण्यासाठी व कफनाशासाठी चांगला उपयोगी ठरतो. 

खजूर/खारीक खाण्याचे फायदे


• खजूरामुळे मलप्रवृत्तीसुद्धा साफ राहते. तहान लागत असल्यास खजुराची बी तोंडात चघळण्यास देतात. त्यामुळे तहान कमी होते.


• खारीक किंवा खजूर यांच्या बिया वाळवून कुटून बारीक करून त्याचे चूर्ण बनवून ठेवावे. हाडांची झीज भरून काढण्यास, सांधेदुखी, कंबरदुखी, स्पॉन्डिलोसिस इ. विकारांमध्ये हे बियांचे चूर्ण चांगले उपयुक्त ठरते. 


benefits of khajur


• प्रसुतीनंतर स्त्रीची कंबर दुखू नये म्हणून तुपात तळलेला खजूर व नंतर त्याच्या बियांचे चूर्ण दुधाबरोबर द्यावे. खजूर हा उत्तम वीर्यवर्धकही आहे. 

khajur fruit


• खजुराची चटणीही करतात. ती अनेक पदार्थांसोबत वापरतात.

•खजूर हा रक्तवर्धक, कामोत्तेजक व हृदयाला बल देणारा आहे. मांसधातूवर्धक असल्याने वयात येणाऱ्या मुलांना पौष्टिक म्हणून खजूर तुपातून अथवा दुधाबरोबर द्यावा.

•आधुनिक शास्त्राच्या मते खजूरामध्ये ए, बी व सी जीवनसत्त्वे असून लोह, तांबे व फॉस्फरस हे घटकही उपलब्ध होतात.

• खारीक हाडांसाठी उत्तम असते. हाडांची मजबुती कमी होत असली किंवा कंबर, पाठ दुखत असेल, तर खारीक दुधाबरोबर उकळून रोज घेण्याने उत्तम उपयोग होतो. यासाठी कपभर दुधात चमचाभर खारीक पूड टाकावी, यातच पाव कप पाणी मिसळावे व पाव कप पाणी उडून जाईपर्यंत मंद आचेवर उष्णता द्यावी. खारकेबरोबर संस्कारित केलेले असे दूध रोज सकाळी पिता येते. 

khajur/ khajoor in marathi


• मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास खारकेच्या आतील बी बारीक करून त्याची धुरी घेण्याने उपयोग होतो. 



जास्त विचारले जाणारे प्रश्न....

१) खजुर खाण्याचे फायदे काय ?
२) खजूरमध्ये किती जीवनसत्त्वे असतात ?
३) खजूर किती खावे?


 
हे पण नक्की वाचा..............

 Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..! 

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!



आरोग्यदायी खजूर : खजूर खाण्याचे गुणकारी फायदे.... आरोग्यदायी खजूर : खजूर खाण्याचे गुणकारी फायदे.... Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 26, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.