उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)

उन्हाळ्यात लघुशंका करताना जळजळ होते, जाणून घ्या घरगुती उपचार...!

Urethritis : उन्हाळ्यात उष्णता वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. साहजिकच लघवीचे प्रमाणही कमी होते. याचाच परिणाम म्हणून लघवीला जळजळ   होते. यालाच 'उन्हाळी' लागणे म्हणतात. ऐरवी लघवीला होणाच्या जळजळला ' मूत्रदाह' असे म्हणतात. 

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)

परत परत होणारा मूत्रदाह उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त दिसतो. उन्हाळ्यात हवा अतिशय गरम असते. तापमानातील वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. सहाजिकच लघवीचे प्रमाणही कमी होऊ लागते. त्याचा परिणाम म्हणून मूत्रदाह होतो. लघवीच्या वेळी आग होते आणि गरमपणा जाणवतो हे लक्षण शरीरातील उष्णता वाढण्याचे आहे.

आयुर्वेदिक उपाय या Whatsapp ग्रुपला Join होण्यासाठी यावर क्लिक करा ...

उन्हाळी लागण्याचा परिणाम म्हणजे लघवी होताना जळजळ होणे, लघवी पिवळी किंवा प्रसंगी तांबडट रंगाची होणे. याबरोबरच मूत्रामध्ये जंतुसंसर्ग होऊन थंडीताप येणे मूत्रपिंडांत किंवा मूत्रमार्गात खडे निर्माण होणे. 

स्त्रियांमध्ये उन्हाळीचे प्रमाण अधिक आढळते स्त्रिया संकोची असल्याने मोकळेपणाने सांगणे टाळतात. तेव्हा दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार करून घेणे महत्वाचे ठरते. काही रुग्णांमध्ये जननमार्गाचे काही आजार असतील तर त्यामुळेही उन्हाळीचा त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
उन्हाळ्यात लघुशंका करताना जळजळ होते, जाणून घ्या घरगुती उपचार...!

उन्हाळीच्या विकारात मूत्रमार्ग रचनेत कोणताही दोष नसतो. उन्हाळी झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिजैविकांचा फायदा लगेच होतो .

कामांच्या व्यापात असताना किंवा बाहेर जाताना पाणी बरोबर नेले नाही तर कित्येक तास पाणी पोटात जात नाही; मात्र त्या काळात घामावाटे शरीरातील पाणी बाहेर जाते आणि श्रमामुळे शक्तीही खर्च होते. कार्यालयात असताना पाणी पिण्याची व्यवस्था जरा दूर असेल तर कामावरून उठून पाणी पिण्याचा कंटाळा केला जातो. हा आळस त्रासदायक ठरतो. शिवाय बाहेर अस्वच्छ ठिकाणी लघवीसाठी गेल्यास त्यातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता स्त्रियांमध्ये अधिक असते. 

आहारात ठेचा, हिरवी मिरची, तळलेले पदार्थ, बाहेरचे पदार्थ, मेथी, आंबट दही वारंवार घेतल्यास शरीरातील उष्णता वाढते आणि लघवीला आग होते. बऱ्याचदा आतील कपडे घामाने दमट होतात आणि त्यामुळे तेथील नाजूक त्वचा लालसर होते व खाजही येते. अशावेळी जंतुसंसर्ग असेलच असे नाही, पण वारंवार घाम पुसणे व घट्ट कपडे न घालणे हे पथ्य जरूर पाळले पाहिजे .

                                                                                         आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!                                                                

🔸 हे उपाय करा:-


◾उन्हाळ्यात धणे-जिऱ्याचे पाणी खूप गुणकारी ठरते. पिण्याच्या पाण्यात धणे आणि जिरे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी पिण्यास घ्या, चवीसाठी खडीसाखर घातली तरी चालेल. कामावर जातानाही बाटलीतच, एकेक चमचा अख्खे धणे आणि जिरे घाला आणि ती बाटली पाणी भरून, किमान चार तास ठेवा. नंतर दिवसभर तेच पाणी प्या. पाणी संपले की पुन्हा पाणी भरा. पण, धणे-जिरे त्यात तसेच राहू द्या. दिवसभर असे पाणी प्यायल्यावर संध्याकाळी ते भिजलेले धणे-जिरे चावून खा व दुसऱ्या दिवशीसाठी पुन्हा हीच पद्धत अवलंबा. धणे-जिऱ्याच्या पाण्याने तहानही लवकर भागते आणि जळजळही कमी होते. पोटातील आग व लघवीत जळजळ होत असल्यासही याचा फायदा होतो. 

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
धणे-जिऱ्याचे पाणी

◾कोकम, लिंबू व आवळ्याचे सरबत हे पित्तशामक असल्याने, पित्तातील उष्ण गुण आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
कोकम, लिंबू व आवळ्याचे सरबत

◾उन्हाळ्यात लिंबू सरबत दिवसातून किमान दोनदा घ्या. त्यामध्ये पाणी, लिंबाचा रस आणि चवीपुरती साखर तर घालाच; पण चिमूटभर मीठ आणि एका वेळच्या सरबतात पाव चमचा खायचा सोडासुद्धा घाला. यामुळे आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण व्यवस्थित राहून कामाला जास्त हुरूप येऊ शकतो. 

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
लिंबू सरबत

◾भरपूर पाणी असणारी फळं सेवन करण्याची आवश्यकता असते. जसं टोमॅटो, काकडी, द्राक्षे, खरबूज, टरबूज इत्यादी.

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)

◾उन्हाळीचा त्रास असणाऱ्यांनी फ्रीजचे पाणी पिऊ नये. माठातले गार पाणीच प्यावे. 

◾रोजच्या आहारात कच्चा कांदा आवर्जुन खावा. त्यामुळे उन्हाळी लागण्याचा त्रास कमी होतो. 

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
कच्चा कांदा

◾उन्हाळी असेल तर लघवीला जळजळ होते, तेव्हा मूत्रमार्गाला थंड पाण्याचे हबके मारून ती जळजळ किंवा आग कमी करता येते. 

◾शक्यतो उन्हात बाहेर पडू नये. पडल्यास छत्री किंवा गॉगल्सचा वापर करावा. 

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
उन्हात छत्री आणि गॉगल्सचा वापर 

◾कोरडे, तिखट अन्न टाळावे. 

◾उन्हाळी असेल तर गार पाण्याने अंघोळ करावी.

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
गार पाण्याने अंघोळ

◾तिखट, तेलकट, तूपकट व खारट पदार्थ खाणे टाळावे.

◾उन्हात फिरणे टाळावे.

                                                                                           आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

◾चंदनाचे खोड उगाळून त्याचा अर्धा चमचा गंध थंड पाण्यात घालून प्यावा. त्रास असेपर्यंत दररोज असे करावे.

◾भरपूर पाणी प्यावे. विशेषतः वाळा घातलेले पाणी जरूर घ्यावे.

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
 वाळा घातलेले पाणी

◾त्याचबरोबर उसाचा रस, नारळाचे पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत अशी सरबते प्यावीत. 

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
 उसाचा रस, नारळाचे पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत

◾ आहारात कलिंगड, द्राक्षे, आंबा अशी फळे; तसेच काकडीचा समावेश करावा.

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
 आंबा

◾स्त्रियांनी धने उकळून ते पाणी प्यावे. यामुळे आग कमी होते. लघवी कमी होत असेल तर गोखरू पावडर आणि धने एकत्र करून पाण्यात उकळून हे पाणी दोन-तीन वेळा घ्यावे.

◾पळसाची फुले उपलब्ध झाल्यास ती ग्लासभर पाण्यात भिजत घालून ७८ तासांनी ते पाणी गाळून प्यावे.

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे)
पळसाची फुले

◾उन्हाळ्यात मांसाहार टाळावा; तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. शक्यतो पालेभाज्यांवर भर ठेवावा, कारण शरीरातील पाणी कमी होण्याने बद्धकोष्ठता वाढते आणि त्यात मांसाहाराने अधिक त्रास होऊन मूळव्याध होण्याची शक्यता असते.

                                                                                                  आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

Notification ला  Subscribe नक्की करा. 

हे पण नक्की वाचा..............

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे....!

उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या ......... 


IPL च्या बातम्यासाठी व UPDATE साठी या लिंकवर क्लिक करा !

उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे) उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ....(मूत्रदाह किंवा उन्हाळी लागणे) Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 12, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.