Summer Eye Health : उन्हाळ्यात डोळ्यांची हि काळजी नक्की घ्या..! नाहीतर....

Eye Care : उन्हाच्या तापाशी आपल्या स्वास्थ्याचा ताळमेळ जुळविताना सगळ्यांनाच बरीच कसरत करावी लागते आहे. त्यातही रोजच्या जीवनात सर्वाधिक कार्यरत असणारे, वापरले जाणारे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे. त्यांना उन्हाची झळ बसू नये, त्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Summer Eye Health : उन्हाळ्यात डोळ्यांची हि काळजी नक्की घ्या..! नाहीतर....
Summer Eye Health : उन्हाळ्यात डोळ्यांची हि काळजी नक्की घ्या..! नाहीतर.... 


डोळ्यांची जळजळ होणे, अधूनमधून डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, दुखणे या तक्रारींचे प्रमाण एकंदरीतच वाढलेले दिसून येत आहे. अलीकडे या लक्षणांची तीव्रता अधिक दिसणे, डोळ्यांना जंतुसंसर्ग होणे, अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अशी लक्षणे निर्माण झाल्यावर वेळेवर नेत्रतज्ज्ञांना दाखवून योग्य ते औषधोपचार करायला हवेत, हे तर योग्यच; पण त्याबरोबरच या तक्रारी निर्माण होऊ नयेत म्हणून डोळ्यांची काळजी/ eye care कशी घ्यावी, लक्षणे निर्माण होत असल्याचे जाणवताच अथवा झाल्यावर कोणते घरगुती उपाय करावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याचीही माहिती करून घ्यायला हवी. 

                                                                                             आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यावर दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

◾ तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.


◾ डोळ्यांना सूज येणे, चिकट स्राव येणे, अशी जंतुसंसर्गाची लक्षणे दिसत असल्यास नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधांच्या दुकानातून कोणतेही आय ड्रॉप्स विकत घेऊन डोळ्यांत घालू नयेत.

डोळ्यांची आग होणे, कोरडेपणा जाणवणे, किंचित लाली असणे, अशा तक्रारींसाठी ल्युब्रिकंट, डोळ्यांना थंडावा देणारे आय ड्रॉप्स घालायला हरकत नाही. परंतु अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड अशा प्रकारचे घटक असणारे ड्रॉप्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही डोळ्यांत घालू नयेत, कारण काही वेळा त्यामुळे उपाय होण्याऐवजी अपाय होणे अधिक संभवते.

आयुर्वेदिक उपाय या Whatsapp ग्रुपला Join होण्यासाठी यावर क्लिक करा ...


Home Remedies for Eye : किरकोळ स्वरूपाच्या तक्रारींसाठी पुढील उपाय घरच्या घरी करता येतील.

१) साध्या नळाच्या पाण्याने दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ धुवावेत.

Home Remedies for Eye : डोळ्यांवर घरगुती उपचार

२) घराबाहेर जाताना गॉगल, टोपी, छत्री या संरक्षक गोष्टींचा अवश्य वापर करावा. पोलराईज्ड प्रकारच्या काचा उन्हाच्या झळांपासून डोळ्यांचे रक्षण करतात.

Home Remedies for Eye : डोळ्यांवर घरगुती उपचार

३) रात्री झोपताना तसेच इतर वेळी शक्य होईल तेव्हा बंद डोळ्यांवर थंड दूध, गुलाबपाणी यात भिजवलेल्या पट्टया अथवा काकडी, कोरफडीच्या गराचे तुकडे पाच-दहा मिनिटांसाठी ठेवावेत. ॲलोव्हेरा जेल, युडी कोलन आय पॅड्सचा वापरही करता येऊ शकतो.

Eye Health

 4) कोरफडीचा गर बंद डोळ्यावर ठेवण्यानेही डोळ्यांची आग लालसरपणा वगैरे त्रास कमी होण्यास मदत होते.

Summer Eye Health : उन्हाळ्यात डोळ्यांची हि काळजी नक्की घ्या..! नाहीतर....

5) झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर शुद्ध गुलाबजलाच्या घड्या ठेवाव्या. झोप शांत लागते .

Summer Eye health

6) गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवल्याने डोळ्यांना गारवा मिळतो.

7) डोळ्यांचा मेकअप, कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असल्यास डोळ्यांच्या स्वच्छतेकडे अधिक जागरूकतेने लक्ष देणे आवश्यक आहे. काही वेळा मेकअपमधील रसायने, तसेच लेन्सेसमुळे डोळ्यांना जंतुसंसर्ग, ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. 

Summer Eye Health : उन्हाळ्यात डोळ्यांची हि काळजी नक्की घ्या..! नाहीतर....

या दिवसांमध्ये निसर्गतःच डोळ्यांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार डोळ्यांना उष्णता जाणवते, डोळ्यांना खाज सुटणे, असे लक्षण दिसून येते. याशिवाय हवेतील धूर, धूळ यांचे प्रदूषण, सतत बदलती ताणपूर्ण अनियमित जीवनशैली, या सर्व गोष्टींचा परिणाम केवळ आपल्या डोळ्यांच्या स्वास्थ्यावर नव्हे, तर संपूर्ण शरीर स्वास्थ्यावर होत आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होणे, स्वास्थ्य संतुलन बिघडणे या गोष्टी घडणे स्वाभाविक आहे.  दैनंदिन जीवनाबरोबरच प्रत्येक ऋतूत आहार कोणता घ्यावा, कोणते अन्नपदार्थ टाळावेत, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, काय टाळावे, याचे सविस्तर वर्णन दिनचर्या, ऋतुचर्चा या अंतर्गत आयुर्वेदीय ग्रंथात केलेले आहे. आपल्या काही रुढी, सण-परंपरांमध्येही त्याचे प्रतिबिंब दिसून येते. उदा:-• गुढीपाडव्याला कडुनिंबाची पाने सेवन करणे, • गोड गाठींना आहारात सेवन करणे, •वाळा घातलेल्या माठातील पाणी पिणे, • कैरीचे पन्हे पिणे, •चिंचवणीचा आहारात समावेश करणे. हा आहार या ऋतूतील वाढणाऱ्या उष्णतेला कमी करणारा आहे.


मोबाईल- टॅब लॅपटॉपच्या जमान्यात आपण आपले डोळे अतिप्रमाणात, तसेच बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने वापरत असतो. या सर्व जादुई यंत्राशिवाय दैनंदिन कामे करणे जवळपास अशक्य आहे, हे जरी खरे असले, तरी ही यंत्रे ज्या डोळ्यांच्या माध्यमातून आपण वापरू शकत आहोत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हे नक्कीच हितकर नाही. एक वेळ ही सर्व यंत्रे आपण 'अपडेट' करू शकतो, बदलू शकतो, पण डोळे बदलून मिळण्याचे तंत्रज्ञान अजून तरी उपलब्ध झालेले नाही, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे या यंत्रांचा दैनंदिन वापर करताना काही गोष्टींची सवय लावून घेणे आवश्यक आहे.

                                                                                                आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

◾ही साधने वापरत असताना:-

eye care in summer

१) विशिष्ट कालावधीनंतर (साधारणतः दोन तासांनंतर काही मिनिटे या साधनांपासून दूर जावे, बंद डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारावेत, शक्य तेवढे दूरच्या अंतरावरील दृश्य पाहण्याचा प्रयत्न करावा. (नैसर्गिक रंग - झाडे, आकाश इ.),


२) ट्वेंटी-ट्वेंटी नियमाचा वापर करा. म्हणजे दर वीस मिनिटांनी, वीस सेकंदांसाठी, वीस फुटांपेक्षा लांबवरची वस्तू पाहणे.


३) अधूनमधून डोळे बंद करून हातांनी हलकेच झाकावेत, दीर्घ श्वसन करावे.


४) नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, गरजेप्रमाणे लुब्रिकंट आयड्रॉप्सचा वापर 7 करावा.


आयुर्वेद मते, आपल्या डोळ्यांप्रमाणेच तळपाय हेसुद्धा अग्नीचे स्थान आहेत, म्हणूनच या दिवसात डोळ्यांच्या हितासाठी तळपायांची काळजी घेतली पाहिजे 

• शक्य होईल तेव्हा अनवाणी हिरवळीवर चालावे. (दूर्वा असल्यास अधिक उत्तम), 


• तळपायांना रात्री गाईचे तूप अथवा खोबरेल तेलाने हलका मसाज करावा. पावले थंड पाण्यात बुडवून काही वेळ बसावे.


• पादत्राणे वापरताना प्लॅस्टिक तसेच उष्णता शोषणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेल्या बूट, चपला यांचा वापर टाळावा.


या सोप्या उपायांमुळे शरीरातील व पर्यायाने डोळ्यांतील उष्णता कमी होण्यास चांगला उपयोग होतो. डोळ्यांमध्ये सतत वाढत जाणारी उष्णता ही नेत्ररोगांना आमंत्रण देणारी ठरू शकते, म्हणून याकडे विशेष लक्ष द्यावे.


eye care in summer

🔸 याबरोबरच आहारात: गरम मसाला, अति आंबवलेले पदार्थ (इडली, उत्तप्पा, आंबोळी, बेकरी प्रॉडक्टस), अति खारवलेले (लोणची, पापड, चिप्स इ.) पदार्थ यांचा सतत आणि वारंवार वापर टाळावा. 

🔸 त्याऐवजी: ताजे लोणी, गाईचे तूप, दूध, तुळशी, सब्जा-बी, डोंगरी आवळा, गुलकंद, धने- जिरे, सैंधव, कोथिंबीर, पुदिना यांचा आवर्जून समावेश करावा.

                                                                                                 आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

अश्या पोस्टसाठी आमच्या  Facebook  ग्रुप ला जॉईन व्हा...!


हे पण नक्की वाचा..............

 Fever : तापावरील पथ्यकारी आहार व उपाय..! लवकर बरा करा ताप...!

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Headache : डोकेदुकीचा त्रास होतोय ? त्यावर करा हे फायदेशीर घरगुती उपाय..! 

vertigo/dizziness : चक्कर येतात? तर लगेच करा हे उपाय ! येणार नाही चक्कर...!



अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या .........


IPL च्या बातम्यासाठी व UPDATE साठी या लिंकवर क्लिक करा !

Summer Eye Health : उन्हाळ्यात डोळ्यांची हि काळजी नक्की घ्या..! नाहीतर.... Summer Eye Health : उन्हाळ्यात डोळ्यांची हि काळजी नक्की घ्या..! नाहीतर.... Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 19, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.